भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. सिनेमा आणि क्रिकेट हे दोन्ही क्षेत्र भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. याचमुळे देशातील आवडत्या सेलिब्रिटींमध्ये या दोघांचे नाव आवर्जून घेतले जाते. बॉलिवूडची गोंडस जोडी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आपल्या प्रत्येक शैलीने प्रत्येकाचे मन कायमच जिंकताना दिसतात. क्रिकेटच्या मैदानावर षटकार आणि चौकार ठोकणार्या विराटचीही एक खास कला आहे, ज्याची माहिती बर्याच चाहत्यांना नाही. विराट कोहली चांगले क्रिकेट खेळतो, आणि खूप छान गाणेही गातो. लग्नानंतर अनुष्कासाठी विराटने एक गाणे गायले होते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अनुष्का भावूक झाली होती. शनिवारी (१ मे) अनुष्का आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म सन १९८८ साली अयोध्यामध्ये झाला होता. आज अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त विरुष्काच्या व्हायरल व्हिडिओबद्दल जाणून घेणार आहोत.
सन २०१७ मध्ये अनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या वेळी विराटने, सर्वांसमोर अनुष्कासाठी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ हे गाणे गायले होते. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बरेच पाहुणे बसलेले दिसत आहेत आणि विराट अनुष्कासाठी गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का भावनिक झालेली दिसत आहे. विराटचे गाणे संपताच, सर्वजण त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू लागतात.
विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर, २०१७ रोजी इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नात केवळ काही खास मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित होते. विराट,अनुष्का आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. अनुष्काने नुकताच मुलगी वामिकाला जन्म दिला आहे.
विराट कोहलीने अलीकडेच आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले होते. त्याचे श्रेय त्याने आपली लाडकी चिमुकली वामिकाला दिले. अर्धशतकानंतर विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो अनुष्काला नेहमीसारखाच फ्लाईंग किस देतो आहे, आणि वामिकाला खायला घाल असा ईशारा करत आहे. विराटची ही शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली. हा व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बाहेर कोरोना असला तरीही, अनुष्का विराटला पाठिंबा देण्यासाठी कायम मैदानात हजर असल्याचे दिसून येते आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अचंबित! टायगर श्रॉफने खतरनाक स्टंट करत मारली पाण्यात उडी, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
-‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आहे ‘द कपिल शर्मा शो’ची खूप मोठी फॅन, म्हणाली…