Monday, June 15, 2026
Home बॉलीवूड ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचं नवीन फोटोशूट पाहिलं का? प्रिंटेड ड्रेसमधील अभिनेत्रीच्या हटके फोटोंवर एक नजर टाकाच

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचं नवीन फोटोशूट पाहिलं का? प्रिंटेड ड्रेसमधील अभिनेत्रीच्या हटके फोटोंवर एक नजर टाकाच

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही या दिवसांत तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्यात मग्न आहे. सतत आपले ग्लॅमरस व हॉट फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन हटके फोटो शेअर केले आहेत. नोराने शेअर केलेल्या या नवीन फोटोशूटमध्ये तिची स्टाईल अगदी पाहण्यासारखी आहे.

या फोटोशूटमध्ये नोरा प्रिंट ऑन प्रिंट ट्रेंडला अतिशय सुंदरपणे फॉलो करताना दिसत आहे. साधा मेकअप आणि ओल्या केसांमध्ये नोराची स्टाईल पाहून, चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत. हे फोटो शेअर करून अभिनेत्रीने सिद्ध केले आहे की, ती साध्या लूकमध्येही बरीच ग्लॅमरस दिसू शकते.

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला माहित आहे की, माझा शत्रू माझा शिकार करतो, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा.” यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

नोराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती मल्टीस्टारर ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त, आता वृत्त असे आहे की, नोरा टायगर श्रॉफच्या ‘गणपत’मध्येही दिसणार आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, ती द्वितीय फिमेल लीडमध्ये दिसेल. तसेच या चित्रपटात टायगरची मुख्य अभिनेत्री असेल, क्रिती सेनन. ‘गणपत’ २०२२ म्हणजे पुढच्या वर्षी रिलीझ होईल.

डान्सिंग क्वीन बनल्यानंतर आता नोराला अभिनयात देखील नाव कमावण्याची इच्छा आहे. ज्यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे. ती ‘भुज’मध्ये सिक्रेट एजंटची भूमिका साकारणार असून, या चित्रपटात ती धमाकेदार ऍक्शन करतानाही दिसणार आहे. आत्तापर्यंत नोरा चित्रपटांमध्ये नाचताना दिसली आहे, पण आता ती अभिनयातही हात आजमावणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

हे देखील वाचा