नोरा फतेही ही एक उत्तम नृत्यांगना आणि चित्रपट अभिनेत्री आहे. बर्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत असतात. नोरा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये बोल्ड आणि सुंदर नृत्यानी आपली वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि नर्तिका नोरा फतेही हिने तिचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो इंस्टाग्रामवर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. त्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. नोराने लिहिले आहे, ‘माझे केस भिजलेले आहेत, माझी त्वचा चंदेरी आहे, मला वाटत नाही की आपण ते घेऊ शकता…’
फोटोमध्ये नोरा फतेहीने मेटलिक सिल्व्हर ड्रेस परिधान केला आहे. ती यात खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोला जवळपास १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच तिच्या चाहत्यांचे तिच्याविषयी असलेले प्रेम दिसून येते. नोरा फतेही लवकरच “भुज: द प्राइड ऑफ इंडिया” या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय हवाई दलाचे पायलट विजय कर्णिकच्या भोवती फिरत आहे. याशिवाय अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांची या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ‘माधापर’ गावातल्या, भारतातील सुमारे ३०० महिलांच्या भोवती फिरत आहे, ज्यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
नोरा फतेहीचे चित्रपट लोकांना खूपच आवडले आहेत. तिने बर्याच कलाकारांसोबत काम केले आहे. यामध्ये सलमान खानचा समावेश प्रामुख्याने आहे. नोरा फतेहीने अनेक गाण्यांवर उत्तम नृत्य केले आहे. यापैकी बरीच गाणी जुन्या गाण्यांचा रिमेक आहेत. नोरा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. त्यामुळे चाहतेही तिच्या पोस्टविषयी कायम खूप उत्सुक असतात, आणि आतुरतेने वाट पाहत असतात.
नोरा फतेही मूळची कॅनडाची असून, ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये तिचे नाव घेतले जाते. मॉडेलिंग, अभिनय, गायन, बेली डान्स अशा विविध कलांमध्ये ती पारंगत आहे. ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने ‘दिलबर दिलबर’ आणि ‘साकी साकी’ या आपल्या शानदार डान्सने प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले. २०१५ च्या टेम्पर या चित्रपट एका गाण्यावर थिरकताना दिसकी होती. त्यानंतर तिला अनेक ठिकाणी डान्सच्या ऑफर येऊ लागल्या. त्यातला सगळ्यात मोठा चित्रपट बाहुबली यातील ‘मनोहरी’ गाण्यावर डान्स करताना दिसली. यानंतर ती ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसली. नंतर तिला बॉलिवूडमधून अनेक ऑफर येऊ लागल्या. सत्यमेव जयते या चित्रपटमधील ‘दिलबर दिलबर’ गाण्याना खरी प्रसिद्धी मिळवून दिली. तिचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके