बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ हिने नुकतेच एका मुलाला जन्म दिला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तिच्या मुलाचा जन्म गुरुवारी (२६ ऑगस्ट) दुपारी झाला. बुधवारी संध्याकाळीच तिला कोलकात्यातील पार्क स्ट्रीटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या मुलाचा जन्म गुरुवारी दुपारी १२.२० च्या सुमारास झाला. रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, नुसरत जहाँ आणि तिचे मूल दोघेही निरोगी आहेत आणि डॉक्टर दोघांवर लक्ष ठेवून आहेत. या दरम्यान अभिनेत्रीचा मित्र यश दासगुप्ता देखील रुग्णालयात उपस्थित होता.
माध्यमातील वृत्तानुसार, नुसरत जहाँपासून वेगळे झालेल्या निखिल जैनने देखील अभिनेत्री आणि तिच्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत. निखिल म्हणाला, “आमच्यात मतभेद असू शकतात, तरीही मी नवजात बाळाला आणि त्याच्या आईला शुभेच्छा देतो. मी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो.” (bollywood nusrat jahan gave birth to a child former live in partner nikhil jain gave best wishes)
नुसरत जहाँने जून २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैनशी तुर्कस्तानमध्ये लग्न केले होते. या डेस्टिनेशन वेडिंगचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण एक वर्ष पूर्ण होण्याआधीच माशी शिंकली आणि त्यांचे संबंध बिघडले. त्यांनंतर दोघेही वेगळे राहू लागले. यानंतर नुरसत जहाँने एक निवेदन जारी करून, तिचे स्वतःचे तुर्कीचे लग्न ‘बेकायदेशीर’ असल्याचे घोषित केले. यासोबतच अभिनेत्रीने असेही सांगितले होते की, ती गर्भवती आहे आणि निखिल जैनपासून वेगळी राहत आहे.
यानंतर, निखिल जैननेही दोघांच्या वाईट चालू असलेल्या संबंधांवर आपली बाजू मांडली. तो म्हणाला होता की, तो आणि नुसरत नोव्हेंबर २०२० पासून एकत्र नाहीत. नुसरत निखिलचे घर सोडून कोलकाता येथील तिच्या घरी आली होती. दरम्यान, ती जयपूर आणि अजमेर दर्गा शरीफमध्ये यश दासगुप्तासोबत दिसली होती. यानंतर बेबी बम्पसह नुसरतचा फोटो व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुपम अन् किरण यांच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण; दोघांनीही दुसऱ्यांदा बांधली होती लगीनगाठ
-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा
-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका