Monday, July 1, 2024

मुला-मुलींचा डान्स तर तुम्ही पाहिला असेलच; एकदा ‘या’ वृद्ध जोडप्याचा ‘वो चली’ गाण्यावरचा भन्नाट डान्सही पाहा

आतापर्यंत आपण लहान- मोठ्या मुलामुलींना डान्स करताना पाहिले असेल. ज्यांना पाहून आपल्याला आनंद होतो. त्यातील काही व्हिडिओ असे असतात, जे काही क्षणातच व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. परंतु हा व्हिडिओ कोणत्याही लहान- मोठ्या मुलामुलींचा नसून एका वृद्ध जोडप्याचा आहे, जो सर्वांनाच प्रचंड आवडला आहे.

कोलकातामधील एका वृद्ध जोडप्याचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाखांपेक्षाही जास्त वेळा पाहिला गेला आहे. सोबतच या व्हिडिओला 27 लाख एवढे लाईक्स देखील मिळाले आहे.

तसं पाहायला गेलं तर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु काही व्हिडिओ असे असतात की, ज्यांना पाहून आपण त्यांच्या प्रेमात पडतो. एक वृद्ध पती- पत्नी यांनी एका कॅफेमध्ये 90 च्या शतकातील गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला इंटरनेटवर खूप लाईक्स मिळत आहे. ‘ममता शर्मा दास’ या महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पती- पत्नी ‘बॉम्बे विकिंग्स’ यांच्या ‘वो चली-वो चली’ या गाण्यावर डान्स करताना दिसले आहेत. या व्हिडिओमध्ये पतीने स्वेटर आणि पत्नीने साडी घातली आहे. या व्हिडिओला सेलिब्रिटीपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच सगळेजण व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत. खरं तर माणसांनी असंच आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. मुळात डान्स करायला वयाची गरज नसते, हे या जोडप्यांनी सिद्ध केलं आहे.

इंस्टाग्रामवर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ कोलकात्यातील ‘पार्क स्ट्रीट’ वरील ‘हार्ड रॉक कॅफे’ मधील आहे. या कॅफेमध्ये 90 च्या शतकातील गाणी गायली जात होती. त्यानंतर या जोडप्याने उठून डान्स फ्लोरवर डान्स केला. असेही म्हटलं जातंय की, जो व्यकी या कॅफेमध्ये ही गाणी गात होता. हे वृद्ध जोडपे त्याचेच आई- वडील आहेत. या व्हिडिओला शेअर करते वेळी, ‘ममता शर्मा दास’ यांनी असं लिहिलं आहे की, “साडीमध्ये डान्स करणाऱ्या महिलेला चिअर्स आणि कोलकात्याला देखील चिअर्स.”

हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वांनी या व्हिडिओप्रती खूपच प्रेम व्यक्त केले आहे.

हेही वाचा-

मराठमोळ्या रितेश- जेनेलिया यांनी आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी बांधली होती लगीनगाठ, पाहा ‘या’ जोडीचे खास व्हिडिओ

उर्वशीच्या नजरेचा तीर अन् चाहत्यांच्या थेट काळजावर घाव! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्ही ‘त्या’ प्रियालाही विसराल

शिल्पाजी, तुमची ऊंची किती हो..? नेहमीच्या प्रश्नाचं अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं उत्तर; पाहा

हे देखील वाचा