Saturday, June 29, 2024

परिणीती अन् राघव यांच्या साखरपूड्यात प्रियांकाच्या ‘त्या’ कृतीने वेधले चाहत्यांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत काल म्हणजेच शनिवारी (दि. 13 मे)ला साखरपुडा केला. अशात प्रियांका चोप्राने तिची चुलत बहीण परिणीतीच्या एंगेजमेंट सोहळ्याला हजेरी लावली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बहिणीच्या साखरपुड्या दरम्यान प्रियांका चोप्रा (priyanka chopra) हिने ऑफ शोल्डर ब्लाउजसह पिवळ्या रंगाची फ्रिल साडी नेसली होती. अशात रेड कार्पेटवर प्रवेश करताच अभिनेत्रीने पॅपराझींना अनेक पाेज दिल्यात. यासाेबतच प्रियांका भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि परिणीतीचे वडील पवन चोप्रा यांच्यासोबतही पोज देताना दिसली. साखरपुडा साेहळा संध्याकाळी 5 वाजता सुरू झाला आणि शीख परंपरेनुसार पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. दोघेही कॉलेजमध्ये एकत्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघांनीही त्यांचे नाते पब्लिक केले आणि त्यांच्या एंगेजमेंटची माहिती दिली. अशात आता दोघांचीही रीतसर एंगेजमेंट झाली असून त्यांचे अधिकृत फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. कलाकरांसह चाहत्यांनीही त्यांना एंगेजमेंट झाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायच झाले तर, अभिनेत्री  लवकरच ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (bollywood parineeti chopra and raghav chadha engagement ceremony priyanka chopra saree look stole the show photos goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या 9 महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश

हे देखील वाचा