Wednesday, July 3, 2024

‘रणवीर सिंग बनणार पप्पा?’ चाहत्याच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, अभिनेत्यालाही केलं टॅग

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने मंगळवारी दुपारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन आयोजित केले होते. त्यावेळी परिणीती चाहत्यांशी बोलण्याच्या मूडमध्ये दिसली, त्यामुळेच ती चाहत्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची बिनधास्तपणे उत्तरे देत होती. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला अनेक मजेदार प्रश्न विचारले. एका चाहत्याने तिला तिचा सह-अभिनेता रणवीर सिंगबद्दल विचारले, ज्याला परिणीतीने उत्तरही दिले आहे.

परिणीती चोप्राच्या एका चाहत्याने तिला ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनमध्ये विचारले की, ‘रणवीर सिंग पप्पा झाला का?’ ज्यावर अभिनेत्रीने रणवीरला टॅग केले करत त्याला कन्फर्म करण्यास सांगितले. परिणीतीने लिहिले, “रणवीर सिंग, कृपया हे कन्फर्म करा.” या प्रश्नावरून हे स्पष्ट झाले आहे, की अभिनेत्याचे चाहते रणवीरच्या वडील होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या सासूचा वाढदिवस एकत्र साजरा केला. यावेळी रणवीरने आपल्या आईसाठी वाढदिवसाचे गाणेही गायले. (bollywood parineeti chopra fan ask questions about ranveer singh on her ask me anything session)

आणखी एका चाहत्याने परिणीती चोप्राला सांगितले, की ती श्रद्धा कपूरसारखी दिसते. चाहत्याने लिहिले, “तू आणि श्रद्धा कपूर बहिणींसारखे दिसता!” ज्याला परिणीतीने उत्तर दिले, “काय?! श्रद्धा मी सिडची जागा घेत आहे.” सोबतच अभिनेत्रीने श्रद्धा कपूरसोबत तिच्या भावाला देखील टॅग केले आहे. त्याचप्रमाणे, अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, ज्याची त्यांना मजेदार उत्तरं मिळाली.

अलीकडेच परिणीती चोप्रा ‘सायना’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा बायोपिक होता. परिणीती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती, ज्यात तिने सायनाची भूमिका साकारली होती. याशिवाय परिणीती आगामी काळात रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत ‘ऍनिमल’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा