Thursday, June 26, 2025
Home वेबसिरीज ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री चक्क साडीवर शुट केले बोल्ड फोटो, सोशल मीडियावर सुरु झाली एकच चर्चा

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री चक्क साडीवर शुट केले बोल्ड फोटो, सोशल मीडियावर सुरु झाली एकच चर्चा

एकता कपूरच्या ‘गंदी बात’मुळे चर्चेत आलेली अन्वेषी जैन अभिनयासाठी कमी अन् तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते. ती सतत इंस्टाग्रामवर काही न काही पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधते. चाहतेही तिच्या पोस्ट्सला प्रतिसाद देत असतात. अन्वेषीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. आता या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

अन्वेषी जैनने पुन्हा एकदा आपला जलवा सोशल मीडियावर पसरविला आहे. तिचे सौंदर्य आश्चर्यकारक आहे, कारण ती जे काही परिधान करते, त्यामध्ये खूपच छान दिसते.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अन्वेषीने रॉयल ब्लू कलरची साडी परिधान केली आहे. यात तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे साडीमध्ये असूनही तिचा बोल्ड अंदाजात यात पाहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत तिने अत्यंत रोमँटिक कॅप्शन लिहिले आहे. तीने लिहले, “मी तुमच्यामुळे आहे, स्वत: ला तुमच्याकडे देत आहे, तुम्ही माझी शक्ती आहात.”

पोस्ट केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये अन्वेषीने पांढर्‍या रंगाचा क्रॉप टॉप आणि क्रोचेटपासून बनवलेली पॅन्ट परिधान करून, तिची यात आकर्षक फिगर दाखवत आहे. तर इतर फोटोमध्येही तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे.

अन्वेषी जैनने एकदा माध्यमांना सांगितले होते, की तिच्या घरात एकवेळी कपडे घालायच्या पद्धतीवर बरेच बंधन होते. तिने असेही सांगितले की, ज्या फिगरमुळे तीला नाकारलं जायचं,  त्याच फिगरमुळे तिला इंडस्ट्रीत काम मिळू लागले.

अन्वेषी एक अभिनेत्री तसेच एक मॉडेलही आहे. 2014 मध्ये तिला गुगलवर सर्वाधिक सर्च केले होते. तिने बर्‍याच ब्रँड्ससोबत काम केले आहे आणि ती एक डेटिंग कोच देखील आहे. ‘गंदी बात’ वेब सिरीजच्या यशानंतर, तिला याच्या दुसऱ्या भागातही काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्या भागाप्रमाणे हा भागही हिट ठरला.

अन्वेषी जैनने एक मॉडेल म्हणून उदयास आली आहे आणि आज ती यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री दोन्ही आहे. ती एक व्यावसायिक महिला बनू इच्छित आहे, ज्यामुळे तिने आपली नोकरी सोडली आणि अभिनय- मॉडेलिंगमध्ये आपली कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा