Monday, July 8, 2024

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या चार दिवसांपासून या अभिनेत्रीच्या लग्नाचे कार्यक्रम धुमधड्याकात सुरू आहेत, ज्यामध्ये हळदी समारंभापासून मेहंदी आणि लग्नापर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचवेळी बुधवारी झालेल्या कव्वाली नाईटचे फाेटाेही समोर आले आहेत.

स्वरा-फहादच्या कव्वाली नाईटमध्ये अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले होते, ज्याचे काही फाेटाे त्यांनी साेशल मीडियावर शेअर करून या जाेडप्याचे अभिनंदन केले आहे. व्हायरल झालेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्री बॉटल ग्रीन वेलवेट सूटमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने मांग टिका, लांब सुंदर झुमके घातले हाेते, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत हाेती तर, फहादने हिरव्या रंगाची शेरवाणी परिधान केली हाेती, ज्यामध्ये ताे देखणा दिसत हाेता.

Swara Bhasker

स्वरा भास्करने कव्वाली नाईटला उपस्थित राहिल्याबद्दल अखिलेश यादव यांचे आभार मानले. तिने लिहिले, “अखिलेश यादव सर तुमचे खूप खूप आभार… आमच्या आनंदाचा भाग झाल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या सेलिब्रेशनला आणखी खास बनवल्याबद्दल धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत सांगितले की, “आम्हा दोघांना आमच्या ओळखीचा अभिमान आहे. दोघांनाही त्यांची ओळख बदलायची नाही आणि कधी बदलणारही नाही. दोघेही एकमेकांच्या अस्मिता आणि धर्माचा आदर करतात.”

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगाताे की, लग्नाच्या खास दिवशी कर्नाटक संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. याशिवाय आज म्हणजेच गुरुवारी 16 मार्च रोजी दिल्लीत रिसेप्शन पार्टिचे आयाेजन केले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्रीचे अनेक जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.(bollywood pictures of swara bhaskar qawwali night surfaced after marriage actress looked stunning in a green suit)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला लाज नाही…’, अभिनेत्री दिव्या अग्रवालने व्हिडिओ शेअर करत अनुराग कश्यपकडे मागितले काम

फ्लॉप चित्रपट देऊनही राजकुमार का वाढवायचे एक लाखांनी फी? अभिनेत्याने सांगितले ‘हे’ कारण

हे देखील वाचा