पती निक जोनासचा लाईव्ह शोमधील परफॉर्मन्स पाहू प्रियांका झाली फिदा, व्हिडीओ शेअर करत असे व्यक्त केले प्रेम


काळानुसार, दिवसेंदिवस प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यातील बंध हे घट्ट होताना दिसत आहेत. कुठेही हे जोडपे त्यांचे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना कायम दिसते.

गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याने त्याच्या ‘दिस इज हेव्हन’ या नवीन गाण्यावर लाइव्ह परफॉर्मन्स दिला. शनिवारी रात्री लाइव्ह दरम्यान अतिथींव्यतिरिक्त निक शोचा होस्टदेखील होता. यात त्याने त्याच्या चाहत्यांसाठी दोन गाण्यांवर परफॉर्म केला. ती ‘दिस इज हेव्हन’ आणि ‘स्पेसमॅन’ ही गाणी आहेत.

प्रियांका तिच्या पतीच्या परफॉर्मेंसने प्रभावित झालेली दिसली. प्रियांकाने या लाइव्ह परफॉरमन्सचा व्हिडिओ शेअर करून पतीवरचे तिचेे प्रेम व्यक्त केले आहे. तिने ट्विट केले की, “अल्बममधील सर्वात आवडते गाणे म्हणजे #स्पेसमॅन @निक जोनास.” 2019 मध्ये जोनास ब्रदर एकत्र आल्यानंतर हा त्यांचा पहिला अल्बम आहे. ‘स्पेसमॅन’ हा अल्बम 12 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

एका मुलाखतीत निकने सांगितले होते की, या अल्बममधील बहुतेक गाणी प्रियांकावरचे त्याचे प्रेम व्यक्त करतात. तो म्हणाला, “यातली बरीचशी गाणी प्रेमाचे पत्र आहेत. मला आनंद झाला की प्रियांकाला ही गाणी आवडली आणि हे सर्वात महत्वाचे होते.”

निक सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे, तर प्रियंका लंडनमध्ये अ‍ॅमेझॉन थ्रिलर सिरीज ‘सिडटेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या आठवड्यात प्रियांकाने निकला इतके दूर असूनही सरप्राईज पाठवले होते. याचा एक व्हिडिओ निक जोनासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तो एक खोली दाखवत आहे, जी अतिशय सुंदर सजवलेली होती. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निकने लिहिले होते की, “माझ्या पत्नीने मला या प्रेम आणि आदराने आश्चर्यचकित केले आहे. धन्यवाद प्रियांका चोप्रा. तु सर्वोत्तम आहेस.”

प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक फेब्रुवारीच्या सुरूवातीस रिलीज झाले. हे पुस्तक प्रियांकाचे जीवन जवळून जाणून घेण्यास मदत करते. ती एका सामान्य मुलीपासून बॉलिवूडची अभिनेत्री, नंतर आंतरराष्ट्रीय व्यक्तिरेखा कशी बनली, हे या पुस्तकातून कळते. तसेच, तिने पुस्तकात तिच्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्सेही सांगितले आहेत. या पुस्तकाने न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट विक्रेत्यांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.