बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रियांका व्यावसायिक कामासोबतच, तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही आनंद घेताना दिसते आणि बर्याचदा निक जोनाससोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले होता, जो आता चर्चेत आला आहे. निक आणि प्रियांकाचे हे प्रेम पाहिल्यानंतर, आता चाहते यावर आपले प्रेम व्यक्त करत आहेत.
प्रियांका चोप्रा निक जोनासवर किती प्रेम करते, हे सोशल मीडियावर दाखवण्यात ती अजिबात मागे पुढे पाहत नाही आणि नि: संकोच होऊन पोस्ट शेअर करते. आता तिने निक जोनासला किस केल्यानंतर, त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिपस्टिकची खूण सुद्धा दिसत आहे.
खरं तर, प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये निकच्या डोक्यावर लिपस्टिकची खूण दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझी लिपस्टिक त्याच्यावर फिकी पडली आहे, मिस यू ऑलरेडी!” या फोटोत फक्त निक जोनास दिसत आहे. परंतु हा फोटो काळजीपूर्वक पाहिला, तर तुम्हाला निकच्या कानाजवळ प्रियांकाच्या लिपस्टिकची खूणही दिसेल.
युजर्सने या फोटोवर जोरदार कमेंट्स केल्या आहेत, कारण त्यांना यात लिपस्टिकचे निशाण दिसले नाही. त्यामुळे नेटकरी कमेंट करून प्रश्न विचारत आहेत की, ते निशाण कुठे आहे? चाहत्यांकडून प्रियांकाचा हा फोटो खूपच पसंत केला जात आहे.
निक सध्या सिंगिंग रियॅलिटी शो ‘द वॉयस’च्या शूटिंगसाठी लॉस एंजेलिसमध्ये आहे. तसेच, प्रियांका त्याच्यापासून दूर न्यूयॉर्कमध्ये आहे. या फोटोच्या माध्यमातून प्रियांका सांगत आहे की, ती तिच्या पतीला किती मिस करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










