Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड परदेशातही रंगली ती होळीच्या रंगात! पाहा प्रियांका चोप्राने शेअर केलेले ‘हे’ खास फोटो

परदेशातही रंगली ती होळीच्या रंगात! पाहा प्रियांका चोप्राने शेअर केलेले ‘हे’ खास फोटो

होळीचा उत्सव हा असा सण आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण रंगांनी रंगलेला दिसतो. मग ती सामान्य व्यक्ती असो किंवा कलाकार, होळीचा रंग प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतो. बॉलिवूड कलाकारही होळीच्या मस्तीत मग्न आहेत. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही होळीचा सण खूप आवडतो. प्रियांकाने पती निक जोनास आणि सासू-सासऱ्यांसह होळी खेळली आहे.

प्रियांका चोप्रा भलेही या दिवसांत परदेशात आहे, पण कोणताही सण साजरा करायला ती कधीच विसरत नाही. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ती होळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे. या फोटोमध्ये सर्वजण व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहेत. प्रियांकाने हातात पिचकारी धरली आहे आणि ती खूप मजेदार मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत प्रियांका चोप्राने आपल्या चाहत्यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो शेअर करताना प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ”होळी, हा रंगांचा उत्सव माझा आवडता सण आहे. आशा आहे, आपण हे आपल्या प्रियजनांसोबत साजरा कराल, परंतु आपापल्या घरात. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.” फोटोत प्रियांका चोप्रासोबत तिचा पती निक जोनास आणि सासू- सासरेसुद्धा दिसले आणि विशेष म्हणजे तेही होळीच्या रंगात रंगलेले होते. अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच पसंत केले जात आहेत.

प्रियांकाने या पोस्टमध्ये कोव्हिडकडे पाहता चाहत्यांना घरीच होळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी प्रियांकाचा पती निकनेही होळीचे फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या होळीच्या पोस्टमध्ये लिहिले की, ”माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.”

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा चाहतावर्ग भलामोठा आहे. यापूर्वीच दोघांनी मिळून ऑस्करसाठी नामांकन जाहीर केले होते. प्रियांका सध्या तिच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तक आणि ओप्रा विन्फ्रेसोबत झालेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. अखेरच्या वेळी ती राजकुमार रावसोबत ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांनी प्रियांकाच्या अंगावर चक्क पाण्याने भरलेली बादली केली होती रिकामी, निक बघतच राहिला; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा