बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते असलेल्या नाजीम रिजवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटमध्ये ७ फेब्रुवारी सोमवार रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलमान खान, प्रीति जिंटा, राणी मुखर्जी यांच्या गाजलेल्या ‘चोरी-चोरी चुपके चुपके’ या सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोक पसरला असून, अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार निर्माते नाजिम हसीम रिजवी हे एका व्याधीने ग्रासले होते, त्याच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती केले गेले होते. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना नक्की कोणता आजार होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. नाजिम हे उत्तरप्रदेश येथील राहवासी होते, त्याच्या निधनानंतर आता त्यांच्यावर उत्तरप्रदेश इथेच अंतिम संस्कार होणार आहे.
नाजिम हसीम रिजवी यांनी बॉलिवूडमध्ये ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’ या हिट सिनेमासोबतच अनेक सिनेमे बनवले. त्यात ‘अंडरट्रायल’, ‘कसम से कसम’, ‘लादेन आले रे ले’ आदी सिनेमांचा समावेश आहे. नाजीम यांनी कसम से कसम या सिनेमातून त्यांच्या मुलाला आजिम रिजवीला लाँच केले होते. मात्र त्याला यश मिळाले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! जगविख्यात तबला वादकाचे चालू कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच