Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझ्या वॉचमॅन आणि ड्रायव्हरने मला…’, न्यूड व्हिडिओ लीकवर उघडपणे बोलली राधिका आपटे

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर लाखो मनावर राज्य करते. राधिका तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. राधिका आपटेने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत बऱ्याच संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत, ज्याद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. या सर्वांच्या दरम्यान ती बर्‍याचदा वादातही राहिली आहे. तिचा एक न्यूड व्हिडिओ लीक झाल्यानंतर, तिला बरेच ट्रोल करण्यात आले होते. यावर आता अभिनेत्री उघडपणे बोलली आहे.

ग्रेझिया मासिकाशी झालेल्या संभाषणात, राधिका आपटे या व्हिडिओबद्दल बोलली आणि तिने सांगितले की, व्हिडिओ लीक झाल्यानंतर घरातून बाहेर पडणे देखील तिला कशाप्रकारे अवघड झाले होते. ‘क्लीन शेव’ चित्रपटाचा एक व्हिडिओ लीक झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले. ज्याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम झाला. ती म्हणाली, “माझ्या वॉचमॅन आणि ड्रायव्हरनेही मला ओळखले होते. व्हिडिओ लीक झाल्यानंतर घराबाहेर पडणे सुद्धा मला कठीण झाले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते.”

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “तरीही, व्हायरल व्हिडिओ पाहून कुणीही सांगू शकेल की त्यातील मुलगी मी नव्हते.” व्हिडिओ अभिनेत्रीच्या ‘क्लीन शेव’ या चित्रपटाचा होता. पण, राधिकाच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये ती नव्हती. यासह ती ‘पार्च्ड’ चित्रपटाविषयीही बोलली आणि सांगितले की, ही भूमिका तिला तेव्हा मिळाली होती, जेव्हा तिला याची खूप गरज होती.

‘पार्च्ड’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना राधिका म्हणाली, “मला या प्रकारच्या भूमिकेची खरोखरच गरज होती. कारण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये असता, तेव्हा तुम्हाला सतत तुमच्या शरीराशी काय करावे लागेल, हे सांगितले जाते. मी नेहमीच असा विचार केला होता की, मी माझ्या शरीरासोबत असे काहीही करणार नाही. न्यूड सीन देणे थोडे भयानक होते, कारण त्या दिवसांमध्ये मी माझ्या बॉडी इमेजशी संघर्ष करत होते. पडद्यावर नग्न होणे, थोडे विचित्रच होते.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

हे देखील वाचा