परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट झाली आहे. कपूरथला, दिल्ली येथे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत शीख परंपरेनुसार हा साेहळा पार पाडला. परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची बातमी समोर येताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. साेबतच दाेघांचा एक व्हिडिओ साेशळ मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये राघव चढ्ढा अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे.
प्रियांका चोप्रा, अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्यासह अनेक चित्रपट स्टार्स आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत राघव आणि परिणीतीने एंगेजमेंट केली. एंगेजमेंट सेरेमनीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहेत, जे पाहिल्यानंतर चाहते या जोडप्याच्या गोंडस केमिस्ट्रीचे कौतुक करताना दिसत आहेत. राघव आणि परिणिती खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर त्यांची एंगेजमेंट झाली.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये, राघवकडे पाहताना परिणीती ‘तेरे बिना दिल नैयो लगदा’ गाण्यावर लिप सिंक करत असल्याचे दिसत आहे. हे गाणे गाण्यासोबतच परिणीती खूपच मस्तीच्या मूडमध्ये आहे. राघव, तिच्या खोडकर कृत्याने वेडा झाला असून यादरम्यान ताे सर्वांसमोर अभिनेत्रीच्या गालावर चुंबन घेऊन तिला मिठी मारताे. अशात लव्हबर्ड्सचा हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सचे खूप लक्ष वेधून घेत आहे.
एका चाहत्याने कमेंट केली, “बहुत शर्मिला है मुंडा.”, तर दुसर्या युजरने कमेंट करत लिहिले, “या दोघांना बघून लक्षात येते की, ते एकमेकांवर किती प्रेम करतात.” देव त्यांचे कल्याण करो.
View this post on Instagram
परिणिती चोप्रा हिने तिच्या साखरपुड्याला मनीष मल्होत्राने डिझायन केलेले कपडे परिधान केले हाेते, तर राघव चड्ढाने त्याचे मामा पवन सचदेव यांनी डिझाइन केलेली शेरवाणी परिधान केली हाेती. पाढऱ्या रंगाच्या भरीव कपड्यांमध्ये दाेघेही खुप सुंदर दिसत असून त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले हाेते.(bollywood raghav chadha gets romantic kiss actress parineeti chopra at engagement)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव
उर्फी जावेदने एका क्षणात पॅपराझींसमाेर बदलले कपडे, व्हिडिओमध्ये पहा जॅकेट कसा बनला सुंदर ड्रेस