Tuesday, July 9, 2024

चित्रपट फ्लॉप होऊनही तब्बल १ लाख रुपये फी वाढवायचे अभिनेते राज कुमार, विचारल्यावर दिले होते हैराण करणारे प्रत्युत्तर

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि डायलॉगसाठी ओळखले जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये राज कुमार यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांचा एक वेगळाच दरारा होता. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर, १९२६ साली एका काश्मिरी पंडित घराण्यात झाला होता. विशेष म्हणजे त्यांचे खरे नाव कुलभूषण पंडित असे होते. ४०च्या दशकात ते मुंबईत आले, आणि पोलीस खात्यात नोकरी करू लागले. राजकुमार यांना चित्रपट क्षेत्रात अजिबात रस नव्हता, परंतु मित्राने त्यांना आग्रह केला, आणि त्यांच्याकढून त्यांची छायाचित्रेही घेतली. हीच ती वेळ होती, जेव्हा राज कुमार यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्याबाबतची एक खास गोष्ट म्हणजे, चाहते राजकुमार यांचे संवाद स्क्रीनवर ऐकण्यासाठी संपूर्ण चित्रपट पाहत असत.

राजकुमार त्या कलाकारांपैकी एक होते, जे स्वत: च्या अटीनुसार चित्रपट करत असे. त्यांना चित्रपटात काम करणारा एखादा कलाकार आवडत नसेल, तर तो चित्रपट ते सोडून देत असत. राज कुमार आपल्या चित्रपट कारकिर्दीतून जेवढे नावाजले गेले होते, तेवढेच ते त्यांच्या स्वभावामुळेसुद्धा नावाजले गेले.

राजकुमार हे दिग्दर्शकांसमोर चित्रपट करण्यास नकार देत असत. त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप झाला असला, तरीही प्रत्येक चित्रपटानंतर ते त्यांचे मानधन वाढवत असत. आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते एक लाख रुपये फी वाढवत असायचे.

याबाबत राजकुमार यांनी लेहरन मीडिया कंपनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्या मुलाखतीत राजकुमार म्हणाले होते की, माझे चित्रपट फ्लॉप होऊ शकतात, परंतु मी नाही. १९९४मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘बेताज बादशाह’ चित्रपट फ्लॉप झाला. राजकुमार सोबत शत्रुघ्न सिन्हा, मुकेश खन्ना असे कलाकारही होते. चित्रपटाच्या अपयशावर राजकुमार म्हणाले की, “मी ज्या भूमिका निभावतो त्यांना पूर्ण न्याय देतो. मी त्यात अयशस्वी झाल्याचा कधीच विचार नाही. चित्रपट हा फ्लॉप असू शकतो, मी नाही. ‘

मुलाखतीत राजकुमार म्हणाले की, “माझे चित्रपट फ्लॉप झाले तरी माझे शुल्क एक लाख रुपयांनी वाढत जायचे. माझ्या सचिवांनी विचारले होते की, राज साहेब चित्रपट फ्लॉप झाला, तरीही तुम्ही एक लाख रुपये वाढवत आहात? मी उत्तर दिले की, चित्रपट चालुदेत अथवा नाही, मी अयशस्वी झालो नाही. त्यामुळे फी एक लाख रुपयांनी वाढेल.’

दिलीप कुमार, राजेश खन्ना, राज कपूर आणि देव आनंद हे दिग्गज कलाकार जेव्हा बॉलिवूडमध्ये अव्वल होते, त्यावेळी राजकुमार यांनीही आपले विशेष स्थान बनवले होते. त्यांच्या असभ्य स्वभावामुळे बर्‍याच वेळा दिग्दर्शक आणि त्यांच्यासोबत काम करणारे कलाकार नाराज होत असत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दया कुछ तो गडबड है’, म्हणत सीआयडी फेम शिवाजी साटम यांनी आपल्या भूमिकेने पाडली चाहत्यांच्या मनावर छाप, तब्बल ७ चित्रपटात बनले पोलीस

-‘दादा’सोबत जोडले गेले होते अभिनेत्री नगमाचे नाव, सौरव गांगुलीच्या पत्नीने रागाच्या भरात उचलला होता अभिनेत्रीवर हात

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

हे देखील वाचा