Saturday, June 29, 2024

‘मला झालेला आजार शत्रूलाही होऊ नये…’, जाणून घ्या हनी सिंगला नेमकं झालंय तरी काय

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगने एका माेठ्या ब्रेकनंतर जोरदार पुनरागमन केले आहे. त्याचा नवीन अल्बम हनी 3.0 रिलीज झाला आहे. 2016 मध्ये हनी सिंगने अचानक ब्रेक घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. प्रकृतीच्या कारणामुळे अभिनेत्याने ब्रेक घेतला होता. नुकतेच त्याने आपल्या आजारांबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. यादरम्यान त्यांनी सांगितले की, त्याची प्रकृती इतकी वाईट होती की ताे दररोज त्यांच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत असत.

नुकतेच एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हनी सिंग (honey singh) याने सांगितले की, ‘या आजारामुळे त्याची झोप उडाली आणि तो तळीराम झाला. त्याला चिंता आणि नैराश्य यासारख्या गोष्टी कधीच झाल्या नव्हत्या, त्यामुळे या आजाराचे निदान करण्यासाठी त्याला दोन वर्षे आणि नंतर उपचारासाठी योग्य डॉक्टर शोधण्यासाठी तीन वर्षे लागली. संगीतातून एवढा माेठा ब्रेक घेण्यामागे त्याचा आजार हे कारण असल्याचेही हनी सिंगने सांगितले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

मानसिक आरोग्याविषयी बोलताना हनी सिंग म्हणाला, ‘मानसिक आरोग्य हा असा आजार आहे, ज्यामध्ये अनेक भिन्नता आहेत. त्यात अनेक रंग आहेत, त्यापुढं एंग्जायटी आणि डिप्रेशन काहीही नाही. ही एक सामान्य सर्दी आहे. मला मेंटल हेल्थचा कोविड 19 होता. याला बायपोलर डिसऑर्डरचे सायकोटिक लक्षण म्हणतात. जे खूप धोकादायक गोष्ट आहे. असे माझ्या शत्रूसाेबत ही घडू नये. मी रात्रंदिवस मृत्यूची प्रार्थना करायचो.’

हनी सिंगच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, हनी सिंगचे पहिले लग्न 2011 मध्ये शालिनी तलवारसोबत झाले होते. पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. (bollywood rapper honey singh new album out rapper singer talks about his mental health says i prayed for death every day night)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
महेशच्या लेकीनं मराठीतून दिल्या शुभेच्छा, आई नम्रताने शेअर केला खास व्हिडिओ
नादचखुळा! कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला ‘वेड’

हे देखील वाचा