भानुरेखा गणेशन ज्यांना आपण प्रेमाने रेखा म्हणतो. चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखाने आपल्या अभिनयाने, सौंदर्याने चाहत्यांची मने कमी वेळातच जिंकली होती. रेखा या चित्रपटांच्या पडद्यावर तर खूप नावाजल्या, परंतु त्यांचे वैयक्तिक जीवन कायमच चित्रपटाची कहाणी बणून राहिले आहे. कधी प्रेमसंबंध, कधी लग्न आणि विवादास्पद गोष्टी रेखांच्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत. जेव्हा पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली होती, तेव्हा तर त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
रेखा यांचे नाव बॉलवूडमधील अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते, पण चर्चेत राहिले जास्त नाव ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत. ही जोडी चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. माध्यमांमध्ये यांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या, पण लवकरच या नात्याला लगाम लावत अमिताभ बच्चन यांनी आपले वेगळे आयुष्य सुरू केले होते.
जेव्हा रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याला पूर्णविराम लागला होता, तेव्हा व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्या आयुष्यात आगमन केले होते. मुकेश अग्रवाल हे दिल्लीचे एक मोठे व्यावसायिक होते. त्यांची कंपनी हॉटलाईन ही स्वयंपाघरातल्या वस्तू बनवायची. मुकेश यांना चित्रपटकलाकारांची खूप आवड होती, आणि ते चित्रपटातल्या कलाकारांना त्यांच्या पार्ट्यांमध्ये बोलवत असत. प्रख्यात डिझायनर बिमा रमानी या मुकेश आणि रेखा यांचे एक सामान्य मित्र होते. रेखा त्यांना बऱ्याचदा भेटायला जायच्या, आणि इथेच त्या मुकेश यांनाही भेटत असत.
त्यांची मैत्री अधिक घट्ट झाल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यानंतर रेखा यांनी ४ मार्च, १९९० रोजी मुकेश यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर रेखा मुंबईत राहत होत्या, आणि मुकेश दिल्लीमध्ये रहात होते. लग्नानंतर मुकेश यांना कायम वाटायचे की रेखा यांनी आता चित्रपटात काम करू नये, पण आपली उत्त्तम चालू असलेली कारकीर्द रेखा सोडायला तयार नव्हत्या. त्याचवेळी मुकेश यांना व्यवसायातही मोठे नुकसान सहन करावे लागत होते.
या दोघांतील वाद मोठ्या प्रमाणात वाढायला लागला होता. मुकेश यांच्या व्यवसायात खूप नुकसान वाढत चालले होते. या सर्व गोष्टींमुळे रेखा या आपल्या खासगी आयुष्यात अजिबात खुश नव्हत्या, आणि त्यांनी लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
आपल्या आयुष्यात आनंद मिळत नसल्याने रेखा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. रेखा यांच्या निर्णयामुळे मुकेश यांचा तणाव अधिकच वाढला होता. वृत्तानुसार, त्यातून आपला एक मार्ग काढत मुकेश यांनी एक निर्णय घेतला, जो अत्त्यंत चुकीचा आणि धक्कादायक होता. व्यवसायात आणि खासगी आयुष्यात खूप नुकसान होत असल्याने, मुकेश यांनी आत्महत्या केली. याचा रेखा यांना खूप मोठा धक्का बसला होता. रेखा यांना कधीच वाटले नव्हते की, या प्रेमळ जोडीच्या नात्याचा शेवट असा होईल आणि ही प्रेमकहाणी अशी संपुष्टात येईल.
यासिर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात लिहिले होते की, मुकेश यांनी आत्महत्या घेण्यासाठी वापरलेली ओढणी ही रेखा यांची होती.
पुढे रेखा यांनी आपल्या कारकिर्दीत असे काही नाव कमावले की, चाहते अजूनही त्यांच्या कामाचे कौतुक करतात. परंतु आपल्या खासगी आयुष्यात मात्र त्या एकट्याच राहिल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-