Wednesday, July 3, 2024

खरंच की काय! क्रिकेटपटू रिषभ पंतने उर्वशी रौतेलाला व्हाट्सएपवर केलं होतं ब्लॉक; समोर आलं यामागचं कारण

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच इंस्टाग्रामवर एक संवादात्मक सत्र आयोजित केले होते. या सत्रात चाहत्यांनी तिला बरेच प्रश्न विचारले. पण उर्वशीच्या एका उत्तराने देशभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमींना चकित करून सोडले. उर्वशीच्या एका चाहत्याने तिला विचारले की, तिचा आवडता क्रिकेट खेळाडू कोण आहे? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, क्रिकेट बघत नाही म्हणून तिला कोणताही क्रिकेटपटू माहित नाही. तथापि, भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीबद्दल तिच्या मनात मोठा आदर असल्याचेही उर्वशी रौतेलाने सांगितले.

माध्यमातील वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी उर्वशी रौतेला आणि भारतीय फलंदाज रिषभ पंत यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या समोर येत होत्या. पण रिषभने उर्वशीला २०१८ मध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले. या नात्यातील अफवांना हवा मिळू नये, म्हणून क्रिकेटपटूने तसे केले. तथापि, रिषभ आणि उर्वशी कधीच याबद्दल बोलले नाहीत.

या अफवादरम्यानच, रिषभ पंतने ईशा नेगीशी असलेल्या त्याच्या नात्याची पुष्टी केली. यावर रिषभने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली की, “मला तुला आनंदी ठेवायचे आहे, कारण तुझ्यामुळे मी आनंदी आहे.” त्याचवेळी ईशा नेगीनेही इंस्टाग्रामवर रिषभसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “माय मॅन, माझा मित्र, माझ्या आयुष्याचे प्रेम.”

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला बर्‍याचदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. अलीकडे, ती एक मास्क घातलेल्या व्हिडिओसाठी चर्चेत आली होती. उर्वशी बर्‍याचदा व्हिडिओ शेअर करते. तिने तिचा एक लेटेस्ट ग्लॅमरस व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांना कॅप्शन देण्यास सांगितले आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशीने ‘हेट स्टोरी 4’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय आता ती तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे.

हे देखील वाचा