चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, ‘खतरों के खिलाडी’साठी त्याला कोणीही स्पर्धा देऊ शकत नाही. यावेळी ही या शोचे रेटिंग जबरदस्त वाढत चालले आहेत. तर त्याचबरोबर प्रेक्षकांना रोहित शेट्टीचे जबरदस्त अंदाजामध्ये होस्टिंग करणे खूप आवडते. अनेक वेळा तो स्पर्धकांना स्टंटसाठी प्रेरित करतो आणि काहीवेळा तो त्याची शाळा देखील घेताना दिसतो. आता रोहित शेट्टी पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. खरं तर रोहित शेट्टीने अशा कलाकारांवर संताप व्यक्त केला आहे, जे मंदिराबाहेर दान करत असताना फोटोग्राफर्सना बोलावतात. यासोबतच रोहित शेट्टीने विमानतळ आणि जिम लूकवर ही वक्तव्य केले आहे.
खरं तर, रोहित शेट्टी काही दिवसांपूर्वीच ‘विथ जेनिस’ नावाच्या चॅट शोमध्ये दिसला होता. या दरम्यान, फोटोग्राफर्सना मंदिराच्या बाहेर बोलावण्याच्या बद्दल त्याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “कोण करतं असं? भाऊ, मी आज या मंदिराच्या बाहेर आहे. तुम्ही फोन कराल तेव्हाच समजेल ना फोटोग्राफरला.”
यासह, रोहित शेट्टी विमानतळाच्या लूकबद्दल म्हणाला की, “आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य विमानतळावर ट्रॅक पँट, चप्पलमध्ये घालवले. पण, आता तो वेगळा खर्च झाला आहे. जोपर्यंत फोटोग्राफर विमानतळावर पोहोचत नाहीत, तोपर्यंत लोक असे म्हणत नव्हते की, “मी विमानातू उतरत आहे. तोपर्यंत तर सर्वजण चड्डी बनियनमध्ये यायचे. हा जिम लूकही नवीन निघाला आहे. लोक किती वेडे असतील, मला माहित नाही, मी नॉर्मल आहे.”
रोहित शेट्टी सध्या देशातील सर्वाधिक हिट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. ज्याचे चित्रपट सुरुवातीपासून हिट आहेत. ‘गोलमाल फ्रँचायझी’, ‘सिंघम फ्रँचायझी’, ‘बोल बच्चन’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दिलवाले’, ‘सिम्बा’ हे त्याचे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याचबरोबर लोक त्याच्या पुढील ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर रणवीर आणि अजय देवगण देखील चित्रपटात कॅमिओ करताना दिसतील. हा चित्रपट मार्च २०२० मध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून
-‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर एका चाहतीच्या वागण्यामुळे, ‘बिग बीं’चे वैवाहिक जीवन आले धोक्यात
–प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री