Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भाईजानचा ‘नो-किसिंग’ पॉलिसीला राम राम! ऑनस्क्रीन केलं दिशा पटानीसोबत ‘लिप-लॉक!’

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधेः युअर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सलमानच्या चाहत्यांमध्ये त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच पसंत केला जात आहे. प्रेक्षकांमध्ये या ट्रेलरची बरीच चर्चा रंगली आहे. पण, याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे, जिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती गोष्ट म्हणजे, सलमान खानचा ऑनस्क्रीन किसिंग सीन.

वास्तविक, सलमान खान अद्याप ऑनस्क्रीन किस करताना दिसला नव्हता. परंतु राधेमध्ये असे घडताना पहिल्यांदाच पाहिले गेले. होय, नुकत्याच रिलीझ झालेल्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये, सलमान दिशा पटानीला किस करताना दिसला आहे. हे पाहिल्यानंतर भाईजानचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, याआधी सलमान खानला ऑनस्क्रीन कोणत्याही अभिनेत्रीला किस करताना पाहिले गेले नव्हते.

सलमान खान स्वतः म्हणाला होता की, चित्रपटासाठी किस करणे आवश्यक नसते. कारण, तो त्यात फारच अस्वस्थ आहे. पण, आता सलमान खानने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिसत आहे. राधेच्या ट्रेलरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच त्याची को-स्टार दिशा पटानीला किस करताना दिसला आहे.

https://twitter.com/bollywoodwaala_/status/1385133415402409987

हे पाहिल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या सीनमध्ये दिशा अंधारात (सावलीत) उभी असते आणि सलमान खान येऊन तिला किस करतो. या सीनबद्दल बऱ्याच युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दिशाचे सध्याचे वय २५ वर्ष असून सलमनाचे वय ५५ वर्ष आहे. यामुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.

सलमान आणि दिशाच्या या लिप लॉकचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने हा स्क्रीनशॉट शेअर करुन लिहिले आहे की, “३२ वर्षाच्या कारकीर्दीत मेगास्टार सलमान खानने प्रथमच दिशा पटानीला पडद्यावर किस केले आहे.” आणखी एका चाहत्याने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, “कारकीर्दीत पहिल्यांदा सलमान खानने केल्विन क्लिन दिशा पटानीसोबत लिपलॉक केले आहे. ओरिजिनल चॉईस, लव्ह ईट!” एका चाहत्याने तर मजेदार अंदाजात लिहिले की, “सलमान भाई बिघडला आहे!”

याव्यतिरिक्त या ट्रेलरमध्ये सलमान-दिशा सोबत, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफही उत्तम अभिनय करताना दिसले आहेत. या चित्रपटात रणदीप हूडा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे देखील वाचा