जगभरातील स्टंटमॅनच्या माऊलींसाठी ‘विद्युत जामवाल’ने प्रसिद्ध केला खास व्हिडिओ; कॅप्शनमुळे अल्पावधीतच तुफान व्हायरल

जगभरातील स्टंटमॅनच्या माऊलींसाठी 'विद्युत जामवाल'ने प्रसिद्ध केला खास व्हिडिओ; कॅप्शनमुळे अल्पावधीतच तुफान व्हायरल


बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ असलेल्या विद्युत जामवालने बर्‍याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. तो नेहमी अ‍ॅक्शन चित्रपटात काम करताना दिसतो. तसेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांनाही चांगलेच आवडतात. विद्युत हा ‘कलारीपयट्टू‘ विद्येत पारंगत आहे.

अभिनेता विद्युत जामवालने शनिवारी स्टंटमॅनच्या आईंना एक गाणे समर्पित केले. तसेच त्याने एक खास संदेशही पारित केला आहे.

विद्युतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो ड्राईव्हिंग करताना दिसत आहे आणि पार्श्वभूमीवर ‘तेरी मिट्टी’ हे गाणे वाजवत आहे. त्यानंतर त्याने सांगितले की हे गाणे तो स्टंटमॅनच्या आईला समर्पित करत आहे.

त्याने हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिलेय की, “आई आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमी स्वतःची काळजी घेतो”.

व्हिडीओमध्ये त्याने पुढे असे म्हटलेय की, “हा संदेश त्या सर्व लोकांसाठी आहे, जे सकाळी कामावर जातात आणि त्यांची आई त्यांना स्वतःची काळजी घ्यायला सांगते. ‘सनक’ चित्रपटाचे शूटिंग मी नुकतेच पूर्ण केले आहे. सर्व अ‍ॅक्शन पूर्ण झाली आहे. मला आनंद आहे की सर्व लोक ठीक आहेत. जे अ‍ॅक्शन आणि स्टंट करतात, हा व्हिडीओ त्यांच्या आईंसाठी आहे. त्यांच्या आई घाबरतात. तर आई कृपया घाबरू नका, आम्ही नेहमीच स्वत: ची काळजी घेऊ. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो.”

विद्युत जामवाल हा एक उत्तम अभिनेता असल्याचे त्याने त्याच्या अभिनयातून वारंवार सिद्ध केले आहे. विद्युतचा शेवटी ‘यारा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

त्याखेरीज अमित साद आणि श्रुती हसन यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशू धूलिया यांनी केले होते. विद्युतने स्वत: चे अ‍ॅक्शन सीन्स स्वतः डिझाइन करतो. प्रत्येकाला त्याची अ‍ॅक्शन स्टाईल प्रचंड आवडते.


Leave A Reply

Your email address will not be published.