Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘संजू बाबा’च्या मुलीला चाहत्याने विचारला खासगी आयुष्याबाबत प्रश्न, म्हणाली…

‘संजू बाबा’च्या मुलीला चाहत्याने विचारला खासगी आयुष्याबाबत प्रश्न, म्हणाली…

बॉलिवूड कलाकारांची जेवढी प्रसिद्धी आहे, तेवढीच प्रसिद्धी त्यांच्या मुलांचीही आहे. मग ती लहान मुलगी आराध्या  बच्चन असो किंवा सुहाना खान किंवा त्रिशाला दत्त. यांच्या नावाची कायमच चर्चा असते. संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्रिशाला फिजिओथेरपिस्ट असून सोशल मीडियावर बर्‍याच समस्यांविषयी जागरूकता पसरवते. रविवारी त्रिशालाने तिच्या चाहत्यांशी इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितले की, जर आपणास प्रेमसंबंधात कोणी फसवले, तर त्यातून कसे बाहेर पडायचे. यासोबतच तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.

त्रिशाला दत्तने तिच्या चाहत्यांसह इंस्टाग्रामवर चॅट सत्राचे आयोजन केले होते. यादरम्यान, तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले, त्यावर त्रिशालाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरीमध्ये त्यांची उत्तरे सांगितली आहेत. यावेळी एका चाहत्याने त्रिशालाला तिच्या प्रदीर्घकाळ चालणाऱ्या नात्याबद्दल विचारले. त्रिशालाने सांगितले की, ‘आमच्यातील नातेसंबंध सात वर्षे टिकले होते. परंतु आता आमच्या दोघांचे ब्रेकअप झाले असून आम्ही दोघेही आयुष्यात पुढे गेलो आहोत.’

त्रिशालाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘७वर्षे… ते नाते आता संपले असून याविषयी मी जास्त खोलात जाणार नाही. पण मी तुम्हाला सांगते की, आमच्या दोघांच्याही आपल्या आयुष्याबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या होत्या, म्हणून आम्ही एकत्रित हा निर्णय घेतला होता. आमच्या दोघांमध्ये खूप फरक होता, जो काळानुसार बाहेर आला होता.’

Photo Courtesy Instagramtrishaladutt

त्रिशालाने पुढे लिहिले, ‘आम्ही दोघे एकमेकांपासून विभक्त होत गेलो. असं होतं… आज त्याचं लग्न झालं आहे आणि, तो मुलांसोबत आहे आणि, मी त्याला शुभेच्छा देते.’ त्याचवेळी त्रिशालाला एका चाहत्याने विचारले की, कुणी तुच्याबरोबर फसवणूक केली आहे का? यावर त्रिशालाने ‘होय’ असे लिहिले.

त्रिशाला संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. ती आजीबरोबर परदेशात राहते. त्रिशालाने तिच्या आई- वडिलांप्रमाणे कलाकार होण्याचा मार्ग निवडला नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

-‘ऑल टाईम फेव्हरेट’, अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ऍनिमल प्रिंटेड ड्रेसमधील फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौतने तापसी पन्नूवर केलेल्या कमेंटवर भडकले चाहते, म्हणाले…

हे देखील वाचा