Friday, July 5, 2024

‘तो’ व्हिडिओ शेअर करत सपना चौधरी म्हणाली – ‘ही आपली औकात, आणि माणसाने कधी स्वतःची औकात…’

लोकप्रिय हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिने आयुष्यात खूप संघर्ष केला. आज तिने आपल्या अथक परिश्रमांनी घरोघरी एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत, देशभरात धमाल करणाऱ्या सपना चौधरीच्या चाहत्यांची यादीही भलीमोठी आहे.

चाहते नेहमीच सपनाच्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. यामुळे सपनाची गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सपनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिचे दोन रूप पाहायला मिळत आहेत. एक रूप आताचे आणि एक सपना स्टेज शो करत होती तेव्हाचे. या व्हिडिओमध्ये एक डायलॉगही ऐकायला मिळत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “ये अपुन का औकात है, इंसान को कभी अपना औकात नहीं भूलना चाहिए.” त्याचवेळी हा व्हिडिओ शेअर करत सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही विसरलो नाही आणि विसरणारही नाही.”

सपना चौधरी ‘बिग बॉस’ च्या ११ व्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमध्ये प्रचंड चर्चेत राहणारी सपना चौधरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तुम्हाला सपना चौधरीचे एकापेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडिओ मिळतील पाहायला मिळतील.

‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा भाग होण्यापूर्वी, सपना फक्त हरियाणवी गाण्यांमध्येच दिसली होती. पण या शोमधून लोकप्रियता मिळाल्यानंतर, तिने हरियाणवी मधील आयटम नंबरपासून पंजाबी, भोजपुरी आणि बॉलिवूड चित्रपटांपर्यंत सर्वत्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

असाच तिचा हा प्रवास बॉलिवूडपर्यंत पोहचला. तिने ‘दोस्ती के साइड इफेक्ट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

हे देखील वाचा