Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सारा अन् जान्हवीच्या ‘गोल्डन ग्लोव’चे रहस्य आले समोर; व्यायाम करत दिल्या सौंदर्य वाढविण्याच्या टिप्सही

कोरोना महामारीच्या काळात आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे. बॉलिवूडमध्येही जवळपास सर्व कलाकार आपल्या शरीराकडे खासकरुन लक्ष देतात. त्याप्रमाणे, अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दोघीही त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत खूप गंभीर आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांचे व्यायामाचे व्हिडिओ त्या चाहत्यांसोबत शेअरही करत असतात. अशामध्ये, सारा आणि जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोघीही लेग रेज, किक बॅक, स्क्वॅट्स सारखे व्यायाम करताना दिसत आहेत. दोघीही अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्या स्टेप्स करत आहेत. खरंतर हा व्हिडिओ साराने सोशल मीडियावर शेअर केला आणि यासोबत तिने सौंदर्य वाढविण्याच्या टिप्सही दिल्या. हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

सारा अली खानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील दिसत आहे. दोघीही फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितच्या देखरेखीखाली व्यायाम करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वेळेनुसार पुढे जावा, किक हाय, स्क्वॅट्स घ्या, अशाप्रकारे तुम्हाला मिळेल गोल्डन ग्लोव.” पुढे तिने लिहिले, “योग्य दिशा दर्शकासाठी नम्रताला विचाराला.”

व्हिडिओवर नम्रता पुरोहितने हार्ट इमोजी पोस्ट करून, तिचे प्रेम व्यक्त केले आहे. आता या व्हिडिओला दोन्ही अभिनेत्रींचे चाहते प्रचंड पसंती देत ​​आहेत. या व्हिडिओ पोस्टवर एकाच दिवसात तब्बल १३ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहते जोरदार कमेंट्सही करत आहेत. एका चाहत्याने लिहले आहे, “बेस्ट जोडी ऑफ सारा आणि जान्हवी.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी कपूरने तिच्या ‘गुड लक जेरी’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. नुकताच तिचा ‘रुही’ चित्रपट रिलीझ झाला आहे. याशिवाय ती ‘दोस्ताना २’ मध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर सारा अली खानने ‘अतरंगी रे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सारा अलीकडेच तिची आई अमृता सिंगसोबत काश्मीरच्या खोऱ्यात एन्जॉय करताना दिसली होती.

हे देखील वाचा