बुधवारी(२४ मार्च) राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर आता हिंदी सिनेसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६६ व्या प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम स्क्रीनप्ले यांसोबतच इतर श्रेणींमध्येही फिल्मफेअर पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्तम अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये ‘दिल बेचारा’ या चित्रपटासाठी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या नावाला नामांकन मिळाले आहे.
दुसरीकडे ‘पंगा’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेेत्रीच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. तापसी पन्नू अभिनित ‘थप्पड’ चित्रपटालाही अनेेक श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. याव्यतिरिक्त मागील वर्षी १० जानेवारी रोजी रिलीझ झालेला अजय देवगण अभिनित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता, टेक्निकल पुरस्कार, सर्वोत्तम कोरिओग्राफी, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम ऍक्शन यांसह अनेक श्रेणींमध्ये नॉमिनेट करण्यात आला आहे. फिल्मफेअर पुरस्कार २०२१ हा येत्या ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कलर्स टीव्हीवर टेलिकास्ट केला जाईल.
इथे पाहा संपूर्ण नामांकन यादी
सर्वोत्तम अभिनेता (पुरुष)
-आयुष्मान खुराना (शुभ मंगल ज्यादा सावधान)
-इरफान खान (अंग्रेजी मीडियम)
-राजकुमार राव (ल्यूडो)
-सुशांत सिंग राजपूत (दिल बेचारा)
-अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)
– अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)
सर्वोत्तम अभिनेत्री (महिला)
-कंगना रणौत (पंगा)
-तापसी पन्नू (थप्पड)
-विद्या बालन (शकुंतला देवी)
-दीपिका पदुकोण (छपाक)
-जान्हवी कपूर (गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल)
सर्वोत्तम चित्रपट
-गुलाबो सिताबो
-गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
-ल्यूडो
-तान्हाजी: द अनसंग वॉरिअर
-थप्पड
सर्वोत्तम दिग्दर्शक
-अनुराग बासू (ल्यूडो)
-अनुभव सिन्हा (थप्पड)
-ओम राऊत (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)
-शरण शर्मा (गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल)
-सुजित सरकार (गुलाबो सिताबो)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
-दीपक डोब्रियाल (अंग्रेजी मीडियम)
-गजराज राव (शुभ मंगल ज्यादा सावधान)
-कुमुद मिश्रा (थप्पड)
-पंकज त्रिपाठी (ल्यूडो)
-सैफ अली खान (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री
-फारूख जाफर (गुलाबो सिताबो)
-मानवी गागरू (शुभ मंगल ज्यादा सावधान)
-नीना गुप्ता (शुभ मंगल ज्यादा सावधान)
-रिचा चड्ढा (पंगा)
-तन्वी आझमी (थप्पड)
सर्वोत्तम चित्रपट
-गुलाबो सिताबो
-गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
-ल्यूडो
-तान्हाजी: द अनसंग वॉरिअर
-थप्पड
सर्वोत्तम प्लेबॅक गायक
-अरिजित सिंग (शायद- लव्ह आज कल)
-अरिजित सिंग (आबाद बदबाद- ल्यूडो)
-आयुष्मान खुराना (मेरे लिए तुम काफी हो- शुभ मंगल ज्यादा सावधान)
-दर्शन रावल (मेहरमा- लव्ह आज कल)
-राघव चैतन्य (इक टुकडा- थप्पड)
-वेद शर्मा (मलंग- मलंग)
सर्वोत्तम प्लेबॅक गायिका
-अंतरा मित्रा (मेहरमा- लव्ह आज कल)
-असीस कौर (मलंग- मलंग)
-पलक मुछाल (मन की डोरी- गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल)
-श्रद्धा मिश्रा (मर जाए हम- शिकार)
-सुनिधी चौहान (पास नहीं तो फेल- शकुंतला देवी)
सर्वोत्तम म्युझिक अल्बम
-छपाक (शंकर एहसान लॉय)
-दिल बेचारा (एआर रहमान)
-ल्यूडो (प्रीतम)
-मलंग (अनेेक कलाकार)
सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी
-केइको नकाहारा (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)
-अर्चित पटेल, जय आय पटेल (पंगा)
-सौम्यनंद सही (ईब आले ऊ!)
-सौमिक सर्मिला मुखर्जी (थप्पड)
-अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)
सर्वोत्तम एडिटिंग
-अजय शर्मा (ल्यूडो)
-आनंद सुबैया (लूटकेस)
-चंद्रशेखर प्रजापती (गुलाबो सिताबो)
-यश पुष्पा रामचंदानी (थप्पड)
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित