Monday, July 1, 2024

सुहाना खानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने शेअर केला लेकीचा गाेंडस व्हिडिओ; म्हणाला, ‘आज आनंद मिळवण्याचा…’

सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान साेमवारी (22 मे) रोजी तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहानाला या खास दिवशी केवळ चाहतेच नाही, तर इंडस्ट्रीतील तिचे मित्रही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच आता सुहानाचे वडिल म्हणजेच शाहरुखनेही आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

सुहानाचा हा सुंदर व्हिडिओ शाहरुख खान (shah rukh khan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सुहानाचा हा बूमरँग व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती ब्लॅक क्रॉप टॉपसोबत ब्लू जीन्स परिधान करून खूपच क्यूट दिसत आहे. खरे तर, व्हिडिओमध्ये सुहाना स्केटिंग करताना दिसत आहे. ही पाेस्ट शेअर करत शाहरुख खानने लिहिले, “आज तुझा आनंद मिळवण्याचा दिवस आहे..लव्ह यू बेबी.” शाहरुखने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुहाना बेबी डॉलसारखी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखने ही पाेस्ट शेअर करताचा सुहानाने त्यावर रिप्लाय दिला आहे. तिच्या या क्यूट व्हिडिओवर कमेंट करताना सुहानाने लिहिले, “हेहे… तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ शाहरुखशिवाय त्याची मॅनेजर पूजा ददलानीनेही सुहानाचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात करणार आहे. यासाेबतच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी देखील त्यांच्यासोबत या चित्रपटातून डेब्यू करत आहेत. या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय सुहाना सोशल मीडियावरही नियमित सक्रिय असून तिचा खूप माेठा चाहता वर्ग आहे.(bollywood shah rukh khan wished suhana khan on her birthday by sharing a cute video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय
सुहाना खानला वडीलांची आवडत नाही ‘ही’ गाेष्ट; म्हणाली, ‘ते मला जवळ घ्यायचे …’

हे देखील वाचा