Wednesday, July 3, 2024

‘किंग’ खानची लाडकी लेक सुहाना आहे शंकराची मोठी भक्त, गळ्यातील पेंडेंट पाहून तुम्हीही म्हणाल ‘खरंच की!’

बॉलिवूडचा ‘किंग’ खान म्हणजेच शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरच सुहानाची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. फॅन फॉलोविंगच्या बाबतीत सुहानाने बॉलिवूडमधील मोठ्यातल्या मोठ्या सुपरस्टार्सना टक्कर दिली आहे.

सुहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल प्लॅटफॉर्मवर येताच तिचे फोटो व्हायरल होऊ लागतात. चाहतेही तिच्या फोटोची आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, सुहानाचे काही हॉट फोटो सोशल प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर चाहते आणि तिचे मित्र-मैत्रीण, या फोटोचे भरभरून कौतुक करून करत आहेत.

सुहाना खान नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ओळखली जाते. दरदिवशी ती तिच्या इंस्टाग्रामवर नवनवीन फोटो शेअर करत असते. यादरम्यान, तिचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहानाचे हे फोटो तिच्या एका फॅन पेजवर पोस्ट केले गेले आहेत. फोटोंमध्ये तुम्ही पाहु शकता की, तिने काळ्या रंगाचा डिप नेक ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये सुहानाच्या मेकअपपासून ते तिच्या लूकपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक केले जात आहे. त्याचवेळी, सुहानाच्या गळ्यातील ओम पेंडेंटही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावरून ती शंकराची मोठी भक्त असल्याचेही दिसून येते.

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. तिथूनच ती तिचे फोटो शेअर करते आणि चाहत्यांशी संपर्कात राहते. नुकताच सुहानाने न्यूयॉर्कमधील तिच्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सुहाना तिच्या दोन मैत्रिणींसह पोज देताना दिसत होती. सुहानाने टर्टलनेक असलेला जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. फोटोसोबतच तिने एक बुमरँगदेखील शेअर केले होते. ज्यात सुहाना तिचे आकर्षक फिगर दाखवताना दिसली होती. तिचे हे फोटोही तिच्या चाहत्यांनी चांगलेच पसंत केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बेबो’चे वडील रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला ‘सैफीना’च्या दुसऱ्या मुलाचा फोटो? फोटो होतोय जोरदार व्हायरल

-प्राणघातक अपघाताची आठवण काढत अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली ‘अजय- काजोल यांनी संपूर्ण इंडस्ट्रीपासून लपवली ही गोष्ट’

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

हे देखील वाचा