बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या अनेक दिवसांपासून ‘शहजादा‘ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कलाकार त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. अभिनेत्याने दिल्लीतील इंडिया गेटपासून दुबईतील बुर्ज खलिफापर्यंत चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. अलीकडेच कार्तिकने दिल्लीच्या इंडिया गेटवर चित्रपटाचे प्रमोशन केले हाेते, ज्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.
प्रमाेशनदरम्यान कार्तिकने घेतली चाहत्यांची भेट
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी)ला दुबईत उपस्थित होता, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. यावेळी कार्तिकने काळ्या जीन्स आणि टी-शर्टसह हिरव्या रंगाचा कोट घातला होता, जाे त्याच्या लूकमध्ये भर घालत आहे. एवढेच नव्हे तर प्रमोशन दरम्यान कार्तिकने त्याच्या चाहत्यांची भेट घेतली आणि सेल्फी काढून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
View this post on Instagram
कार्तिक आर्यन ‘शहजादा’ चित्रपटातून निर्माता म्हणून करणार पदार्पण
शहजादा या चित्रपटा विषयी बाेलायचे झाले, तर कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य अभिनेता तर आहेच, पण या चित्रपटातून तो निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्याने जीवाचे रान केले आहे. मोस्ट अवेटेड हा चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’ हा चित्रपट 17 फेब्रुवारीला हाेणार प्रदर्शित
चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर कार्तिक आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त या चित्रपटात मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर दिसणार आहेत. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमने संगीत दिले आहे.(bollywood shehzada film came to compete with pathan film trailer shown on burj khalifa )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
डायरेक्टरने खूप मनवलं, तरीही समंथा अडली; ‘पुष्पा 2’मध्ये ‘तसलं’ काम करण्यास थेट दिला नकार