बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज लावला जातोय की, अभिनेत्री तिचा सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत लग्न करणार आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील दोघांची खूप चर्चा होत आहे. दरम्यान अशी शक्यता आहे की, हे जोडपे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात. मात्र, त्यानंतर श्रद्धाने या सर्व अफवा फेटाळल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

साल २०१९ मध्ये श्रद्धाने एका मासिकासाठी फोटोशूट केले होते, ज्यासाठी तिने रोहनसोबत काम केले होते. त्यावेळी श्रद्धा आणि रोहन दोघांनाही तिचा भाऊ सिद्धांत कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांनी खूप चिडवले होते. तेव्हापासूनच त्यांचे रिलेशनशिप कन्फर्म झाले आहे. नुकतेच, श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ प्रियांक शर्मा आणि तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांनी रोहनशी तिच्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. (bollywood shraddha kapoor rohan shrestha to tie the knot soon aunt padmini kolhapure and her son priyank sharma replies)
एक वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियांकने श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. बहिणीच्या लग्नाच्या प्रश्नावर प्रियांक म्हणाला, “मी नो कमेंट म्हणेल. यावर मी काय बोलू यार. पण, होय जर तुम्ही पुढच्या दृष्टीकोणातून बघत असाल, तर साहजिकच लग्नाची वाट पाहणे चांगले आहे.”

दुसरीकडे, श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे म्हणतात की, “क्या बात है. हा खूप विचित्र प्रश्न आहे. असे झाल्यास तुम्हाला समजेलच.” यापूर्वी एका मुलाखतीत रोहन श्रेष्ठचे वडील राकेश श्रेष्ठ यांनी सांगितले होते की, रोहन आणि श्रद्धा कॉलेजच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत. याशिवाय जुहूमध्ये त्याचे अनेक कॉमन मित्र आहेत. हे दोघेही त्यांच्या व्यावसायिक जीवनात खूप चांगले काम करत आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, त्या दोघांनी लग्नाबाबत कोणताही निर्णय घेतला, तरी कुटुंब त्यांना पाठिंबा देईल. कारण ते जे काही निर्णय घेतील तो योग्यच असेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट
-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत










