ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज जगभरात त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत जे त्यांना ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणाऱ्या या गायिकेने यूट्यूबवर एक अनोखा रेकॉर्ड केला आहे, ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
गायिका अल्का याज्ञिक (alka yagnik) यांनी यूट्यूब प्लॅटफॉर्मवर 15.3 अब्ज स्ट्रीमसह सर्वाधिक ऐकलेल्या गायिकाचा विक्रम नोंदवला आहे. 2022 मध्ये त्यांना सर्वाधिक ऐकले गेले, ज्यामुळे त्या जगातील सर्वात जास्त ऐकली जाणाऱ्या गायिका बनल्या आहेत.
गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डनुसार, 2022 मध्ये, अल्का याज्ञिक 15.3 अब्ज स्ट्रीमसह यूट्यूब वर सर्वाधिक ऐकलेल्या गायिका बनल्या आहेत. इतकंच नाही तर या यादीत असंही समोर आलं आहे की, गायिकेचं लोकप्रिय गाणं ‘एक दिन आप’ हे 2020 आणि 2021 मध्ये यूट्यूबवर 16.6 अब्ज वेळा स्ट्रीम करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
चार्टमास्टरच्या म्हणण्यानुसार, यूट्यूब चे जवळपास 20 टक्के सदस्य भारतातील आहेत. जेकी जागतिक स्तरावर फक्त आशियाचा सर्वात मोठा मार्केट शेयर आहे, दक्षिण कोरियाचे सुपरस्टार बीटीएस आणि ब्लॅकपिंक 7.95 अब्ज आणि 7.03 बिलियनसह चार्टमध्ये टाॅपवर आहेत. याशिवाय भारतीय गायक उदित नारायण, अरिजित सिंग आणि कुमार सानू यांचाही अनुक्रमे 10.8 अब्ज, 10.7 अब्ज आणि 9.09 अब्ज या यादीत समावेश आहे.
अलका याज्ञिकने 1990 मध्ये संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आजपर्यंत त्या आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट आणि अल्बमसाठी सुमारे 20 हजार गाणी गायली आहेत. ‘अगर तुम साथ हो’ गाण्यापासून ते ‘यू आर माय सोनिया’ पर्यंत अनेक मोठी ब्लॉकबस्टर गाणी त्यांनी दिली आहेत. यासह, त्यांनी 36 नामांकने जिंकली आहेत, ज्यात दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी सात फिल्मफेअर पुरस्कार आहेत.( bollywood singer alka yagnik became the worlds most listened singer beats bts and taylor swift too)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! मराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
अनुपम खेर अन् नर्गिसने स्वतः वाढले मुंबईतील डब्बावाल्यांना जेवण, चाहत्यांनी घेतला क्लास