Friday, July 5, 2024

अरमान मलिकही पडला बॉलीवूडच्या ‘घाणेरड्या राजकारणाचा’ बळी, गाण्यात रिप्लेस केल्याने गायक झाला भावूक

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी आतापर्यंत इंडस्ट्रीत सुरू असलेल्या राजकारणावर खुलेपणाने भाष्य केले आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राने देखील बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा पर्दाफाश केला, त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे मत मांडले. अशातच आता गायक अरमान मलिकही या यादीत सामील झाला आहे. इंडस्ट्रीतल्या घाणेरड्या राजकारणालाही त्याची बळी पडल्याचं गायकानं उघड केलं आहे.

अलीकडे, गायक अरमान मलिक (armaan malik) याने उघड केले की, बॉलीवूडमधील अनेक गायकांना त्यांच्या कामासाठी पैसे दिले जात नाहीत, जे अन्यायकारक आहे. यासाेबतच त्यांना अनेकदा अस्पष्ट कारणास्तव प्राेजेक्टमधून काढून टाकले जाते किंवा रिप्लेस केले जातं असल्याचे गायकाने सांगितले.

विविध कारणांमुळे इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेणारा अरमान म्हणाला, “जेव्हा त्यांची रिप्लेस करण्यात आली तेव्हा ताे अस्वस्थ होऊ लागला. त्याने सांगितले की, न्यूझीलंडमध्ये काही काळ घालवल्यानंतर त्याने सर्व काही सोडून आपल्या संगीतावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.”

अरमानने सांगितले की, “बॉलीवूडमध्ये एक असा टप्पा होता, जेव्हा मला अनेक गाण्यांमध्ये रिप्लेस करण्यात आले, ज्याने मी एक प्रकारे घाबरलाे. मला वाटू लागले की, मी चांगला गायक नाही आणि मी हे माझ्या बाबतीत होऊ देऊ शकत नव्हताे. मी गायक म्हणून कसा आहे याबद्दल मला खूप आत्मविश्वास आहे, पण ही परिस्थिती आहे. जर, मी चांगले गायले नाही म्हणून मला रिप्लेस केले असते, तर मी ते स्वीकारले असते. मात्र, जर मला इतर कारणांमुळे किंवा राजकारणामुळे काढून टाकले गेले, तर मी ते स्वीकारत नाही.”

बॉलीवूडमधील गुपिते उघड करताना गायक म्हणाला की, “चित्रपटात गाणं गायला गायकांना याेग्य मोबदला दिला जात नाही. साहजिकच संगीताच्या प्रेमापोटी तुम्ही काही गोष्टी करता, पण मोबदला मिळण्याची अपेक्षाही असते. मात्र, आम्हाला मोबदला मिळत नाही आणि आम्हाला त्याची इतकी सवय झाली आहे की, इंडस्ट्रीत याबद्दल कुठेही बोलले जात नाही. गाणे हिट झाले, तर गायक लाइव्ह शोमधून कमाई करेल, असे संगीतकारांना वाटते. आपण स्टुडिओत येतो, एखादे गाणे गातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कळते की, ते कोणीतरी गायले आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना मानधन मिळत नाही हे सर्वसामान्यांना माहीत नाही.” असे अरमानने आपले मत व्यक्त करताना सांगितले.(bollywood singer armaan malik reveals singers dont get paid for singing in films in bollywood we are replaced all the times )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट

रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा