Wednesday, June 26, 2024

‘त्यावेळी दीपिकाने मला खूप साथ दिली…’ हनी सिंगचा धक्कादायक खुलासा

गायक हनी सिंगच्या रॅप गाण्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. हनी सिंग त्याचा नवीन अल्बम 3.0 लाँच केल्यानंतर पुन्हा संगीताच्या दुनियेत परतला आहे. गेल्या कालावधीत त्याचा घटस्फोटही झाला असून सध्या तो अभिनेत्री टीना थडानीला डेट करत आहे. अलीकडेच हनी सिंगने मानसिक आरोग्याविषयी बोलताना सांगितले की, काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला त्याच्या मानसिक स्थितीवर मात करण्यासाठी खूप मदत केली.

हनी सिंग (honey singh) याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या मानसिक आरोग्याविषयी बोलताना खुलासा केला की, दीपिका पदुकोणने त्याला मानसिक आरोग्य समस्यांशी झुंजत असताना सल्ला दिला, जेव्हा त्याला समजत नव्हते की, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा हवा.

हनी सिंग पुढे म्हणाला की, “सर्वांनी मला खूप सपोर्ट केला, जेव्हा माझी प्रकृती खूप बिघडली तेव्हा मला समजत नव्हते की, कोणत्या डॉक्टरकडे जावे. त्यावेळी दीपिकाने मला खूप साथ दिली. दीपिकाला वाटले की, मलाही तिच्यासारखीच समस्या आहे, माझे प्रकरण खूप गंभीर हाेते. दीपिकाने माझ्या कुटुंबीयांना डॉक्टरांचा सल्ला दिला. मी पण डॉक्टरांकडे गेलो. दीपिकाने माझ्यासाठी खूप काही केले आहे.” तो पुढे म्हणाला, “शाहरुख भाईने खूप साथ दिली, अक्षय पाजीचे देखील फोन आले. मात्र, मी पाच वर्ष फोनवर बोललो नाही आणि तीन वर्षे दूरदर्शन पाहिले नाही.”

हनी सिंग 2014मध्ये त्याच्या ‘देसी कलाकार’ अल्बमनंतर संगीत जगतातून गायब झाला होता. त्यांनी चित्रपटांसाठी काही गाणी गायली हाेती, पण बहुतांशी प्रसिद्धीपासून ताे दूर राहिला. आता त्याने अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘सेल्फी’ आणि सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये गाणे गायले आहे. हनी सिंगच्या या नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood `singer honey singh said deepika padukone help during his mental health problem and suggested him a doctor)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘पतली कमरिया…’म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी साडीमध्ये लगावले जोरदार ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल

चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला, आलंय माझ्या राशीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा