बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा अर्यन खान हा क्रूझ शिपमध्ये अंमली पदार्थ प्रकरणात गेले दोन दिवस झाले अटक आहे. त्याला गुरुवारपर्यंत (७ ऑक्टोबर) कोठडीत ठेवले जाणार आहे. आर्यनला अंमली पदार्थांचे सेवन, तसेच देवाण- घेवाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील अटक केले आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत त्यांनाही एनसीबी कोठडीत ठेवले जाणार आहे. आर्यनला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. आता बॉलिवूड गायक मिका सिंग देखील खान कुटुंबाचे समर्थन करण्यासाठी पुढे आला आहे.
प्रसिद्ध गायक मिका सिंग याने आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याने एनसीबीला चांगलेच सुनावले आहे. त्याने सोशल मीडियावर आर्यन खान प्रकरणाबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे. (Bollywood singer Mika Singh has sarcastic response to Aryan Khan’s arrest said, was he the only one on cruise)
मिका सिंगने कोर्डेलिया क्रूझ जहाजेचा एक फोटो ट्वीट केला आहे, ज्यावर एनसीबीने छापा टाकला होता. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “व्वा काय सुंदर आहे कोर्डेलिया क्रूझ. काश मी तिथे जाऊ शकलो असतो. मी असं ऐकलं आहे की, तिथे खूप लोक आले होते. मग एवढ्या मोठ्या क्रूझमध्ये फक्त आर्यन खान एकटाच फिरत होता का? कमाल आहे. शुभ सकाळ तुमचा दिवस चांगला जाओ.” मिका सिंगचे असे म्हणणे आहे की, त्या क्रूझमध्ये बाकी अनेक लोकं होती मग फक्त आर्यन खान कसा सापडला.
Wow what a beautiful @CordeliaCruises I wish I could have visted. I heard lots people were there but I couldn’t see anyone els accept #AaryanKhan ..
Itne bade cruse mei sirf aariyan hi ghoom raha tha kya.. hadd hai.. good morning have a wonderful day.. pic.twitter.com/BJ72yHpkl5— King Mika Singh (@MikaSingh) October 5, 2021
मिका सिंगने केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकजण त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आर्यन खानला सोमवारी (४ ऑक्टोबर) कोर्टाकडून जामीन मिळाला नाही. त्याच्या वकिलांना त्याला जामीन मिळवून द्यायचा होता, परंतु कोर्टाने एनसीबी कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
एनसीबीच्या हाती आलेल्या माहितीनुसार, त्यांनी शनिवारी (२ ऑक्टोबर) मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या ‘कोर्डेलिया: द इंप्रेस’ नावाच्या एका क्रूझ शिपवर छापा मारला. तिथे रेव्ह पार्टी चालू होती. यामध्ये अंमली पदार्थ मिळाले ज्यामध्ये आर्यन खानसोबत आणखी आठ जणांना अटक केले आहे. यामध्ये तीन मुलींचा देखील सहभाग आहे.
आर्यन खानची केस मुंबईमधील प्रसिद्ध आणि सगळ्यात महागडे वकील सतीश मानेशिंदे लढत आहेत. परंतु कोर्टात त्यांनी आर्यनला सोडवण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यनजवळ १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या सापडल्या आहेत. आर्यन केवळ २४ वर्षांचा आहे आणि तो देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे ऐशोआरामाचे आयुष्य जगतो. या प्रकरणात आर्यनने या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, गेल्या ४ वर्षांपासून तो अंमली पदार्थांचे सेवन करतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन