Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड माेठी बातमी! प्रसिद्ध गायिकेचा भीषण कार अपघात, अनुभव सांगत म्हणाली, “माझे संपूर्ण आयुष्य…”

माेठी बातमी! प्रसिद्ध गायिकेचा भीषण कार अपघात, अनुभव सांगत म्हणाली, “माझे संपूर्ण आयुष्य…”

‘पोनिन सेल्वन 2’मधील गायिका रक्षिता सुरेश हिचा मलेशिया प्रवासादरम्यान मोठा कार अपघात झाला. याची माहिती खुद्द गायिकेने तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. रक्षिता सध्या मलेशियामध्ये असून रविवारी (दि. 7 मे)ला हा अपघात झाला. तिने स्वत: व्यतिरिक्त क्रूच्या स्थितीबद्दलही अपडेट दिले आहे.

रविवारी (दि. 7मे)ला रक्षिता सुरेश (rakshita suresh) मलेशियाच्या विमानतळाच्या दिशेने कारने जात होती. मात्र, यादरम्यान तिची कार डिव्हायडरला धडकली. याबाबतची माहिती शेअर करताना रक्षिता सुरेश हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “आज आमचा मोठा अपघात झाला आहे. मी ज्या कारमध्ये होतो ती डिव्हायडरला धडकली. मी मलेशिया विमानतळावरून परत येत होती. त्या 10 सेकंदात माझे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर आले. एअरबॅग्जमुळे आम्ही वाचलो. नाहीतर परिस्थीती बिघडली असती. घडलेल्या प्रकारामुळे आम्ही घाबरलो आहोत आणि इतर सहप्रवासी सुरक्षित आहेत. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आम्ही थाेडक्यात वाचलो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakshita Suresh (@rakshitasuresh)

रक्षिता सुरेश 2009मध्ये आलेला ‘लिटिल स्टार सिंगर’ रिअॅलिटी शो विजेती आहे. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत. यासाेबतच अलीकडेच रिलीज झालेला ‘पोनीने सेल्वन 2’मध्येही तिने एक गाणं गायलेलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakshita Suresh (@rakshitasuresh)

‘पोनीने सेल्वन 2’ चित्रपटाबद्दल बाेलायचे झाले तर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटींचा व्यवसाय केला आहे. पोनीने सेल्वन 2चे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे.(bollywood singer rakshita suresh met with a big car accident in malaysia shared the details)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

“आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे” केदार शिंदे यांनी ‘या’ विनोदी अभिनेत्यासाठी लिहिले खास पोस्ट

हे देखील वाचा