लोकप्रिय गायिका स्वरकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहिण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज वाढदिवस आहे. 15 डिसेंबर 1935 रोजी मध्यप्रदेशात त्यांचा जन्म झाला. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायलेल्या उषा मंगेशकर यांनी त्यांच्या भावंडांप्रमाणेच भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले (asha Bhosle) आणि संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर (Hridaynat mangeshkar) यांच्या तुलनेने कमी प्रसिद्ध मिळूनही उषा मंगेशकर यांची कारकीर्द उजळलेली आहे. कोणत्याही प्रसिद्धचा लोभ न करता उषाताई संगीत साधना करीत राहिल्या. आज (15 डिसेंबर) संगीतकार उषा मंगेशकर त्याचा 88वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहे त्यांच्या खास वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विषयी जाणून घेऊया.
उषा मंगेशकर यांनी ‘आम का तारा’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये ‘मेरी बडी भाभी’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांच्या खास वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. उषा यांच्या वडिलांचे बालपणीच निधन झाले. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घरातली मोठी बहीण असणाऱ्या लता मंगेशकर यांनी गाणं गायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या बहिणीने आशा आणि उषा यांनीही हळूहळू गाणे गाण्यास सुरूवात केली.
उषा ताईनी 1935मध्ये पार्श्वगायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी अनेक कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये गाणे गायले. पण त्यांच्या या कामाला प्रसिद्धी 1975मध्ये आलेल्या ‘जय संतोषी मा’ या चित्रपटाने त्यांना त्यांची ओळख दिली. या चित्रपटात त्यांनी ‘मैं तो आरती उतारू’ हे गाणे गायले होते. या गाण्यानं त्यांना एका रात्रीत स्टार बनवले.
उषा मंगेशकर यांनी 60 वर्षाहून अधिक काळ गाणे गायले. त्यांनी1992 मध्ये दूरदर्शनवर ‘फुलावती’ या संगीत नाटकाची निर्मिती केली. ज्याची कथा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb purandare)यांच्यावर आधारित होती.
हेही वाचा-
–Rashmika Mandannaचे ‘हे’ फोटो पाहून अनेकांच्या चुकला काळजाचा ठोका, फोटो तुफान व्हायरल
–राणा डग्गुबत्तीने 40 अंडी खात, दिवसभर जिममध्ये घाम गाळत साकारली होती भल्लालदेवची भूमिका