Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अखेर हनी सिंगने बादशाहसाेबतच्या वादावर साेडले माैन; म्हणाला,”आम्ही कधीच मित्र…”

हनी सिंग सध्या त्याच्या नवीन गाण्यांमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अलीकडेच तो होमी दिल्लीवाला सोबत त्याच्या लेटेस्ट रिलीज ‘कन्ना विच वालीयान’च्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचला. यादरम्यान हनी सिंगने मीडियाशी संवाद साधला आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांपैकी एकाने हनी सिंगला बादशाहसोबतच्या वादाबद्दल विचारले. यावर हनी सिंगने असे काही उत्तर दिले की, सर्वच थक्क झाले. काय म्हणाला गायक? चला जाणून घेऊया…

हनी सिंगने बादशाहसाेबतच्या वादावर अखेर केला खुलास
हनी सिंगने (honey singh) सांगितले की, “त्यांच्यात भाऊबंदकी होती, पण ते कधीच मित्र नव्हते.” ताे म्हणाला, “आम्ही एकत्र खूप काम केले आहे. मी एक संगीत निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या अल्बमवर काम करत होतो, जो अर्धवट सोडला गेला, पण आम्ही कधीच मित्र नव्हतो. म्हणूनच आधी मैत्री होती की, आता मैत्री होईल हे सांगता येत नाही. प्रेम पूर्वीही होते आणि अजूनही आहे. आम्ही आता एकत्र काम करत नाही आणि भेटायलाही वेळ मिळत नाही, पण प्रेम कायम आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

हनी सिंगने ‘सेल्फी’ चित्रपटात गायले ‘चमकिली’ हे गाणं
हनी सिंगच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर हनी सिंग सध्या त्याची गाणी रिलीज करत आहे. तो लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित अल्बम ‘हनी 3.0’ रिलीज करणार आहे. अलीकडेच त्याने ‘सेल्फी’मध्ये अक्षय कुमारसाठी ‘चमकिली’ हे गाणे गायले आहे, जे लोकांना खूप आवडले. या गाण्यात हनीने बऱ्याच दिवसांनी अक्षय कुमारसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली असून, दाेघेही अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये दिसले आहेत.(bollywood singer yo yo honey singh said in recent media interaction he and badshah were never friends)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही जणू एक वर्षांनी…’, अनुपम खेर यांनी अनिल कपूरसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ केला शेअर

पलक तिवारीच्या ‘या’ मादक फोटोंनी साेशल मीडियावर लावली आग, एकदा पाहाच

हे देखील वाचा