Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट या दिवाळीत ५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला असून, अक्षय कुमारने स्वतः याची सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची वाट गेल्या दीड वर्षांपासून त्याचे चाहते वाट पाहत आहे. अखेर त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट या दिवाळीत ५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर येणार आहे. अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे त्रिकूट रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या फ्रँचायझी सिंघम मालिकेचा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर चाहत्यांसोबतही आनंदाची बातमी शेअर करत एक खास व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. त्याने विडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मध्यांतर संपला, आता वेळ आली, ५ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चला आमच्याबरोबर हा उत्सव साजरा करा.” या कॅप्शनसोबत त्याने ‘बॅक टू सिनेमा’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

त्याचबरोबर निर्मात्यांकडून सुद्धा एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी लिहिले की, ‘देशभरात सिनेमागृह सुरू झाल्याच्या बातमीने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित शेट्टी आणि टीम ‘सूर्यवंशी’ तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह सिनेमागृहांमध्ये आपले स्वागत करत आहेत. बहुप्रतिक्षित ऍक्शन एंटरटेनर सूर्यवंशी ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. आपली भेट चित्रपटगृहांमध्ये होईल.” यासोबतच त्यांनी ‘सूर्यवंशी’ आणि ‘बॅक टू सिनेमा’ हे दोन हॅशटॅग वापरले आहे.

यापूर्वी हा चित्रपट २४ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची प्रदर्शित डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता परिस्थिती सुधारल्यामुळे चित्रपटगृहे उघडल्यानंतर निर्मात्यांनी हा सिनेमा दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूर्यवंशीचा ट्रेलर २०२० मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय कुमार चित्रपटात एटीएस पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण सिंघम आणि रणवीर सिंग सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफची जोडी पुन्हा एकदा सूर्यवंशीमध्ये मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी स्वतःचा सहवास एन्जॉय करताना दिसली पूजा सावंत, आकर्षक लूकने चाहते घायाळ

-‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल

-‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी

हे देखील वाचा