बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने शुक्रवारी (5 फेब्रुवारी) आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचे महानायक आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या मुलाला एका हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या.
अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे 2 जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. यातील एक फोटो असा आहे, ज्यात अभिषेक लहान होता आणि अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा हात पकडला आहे. त्यानंतर दुसरा फोटो एका कार्यक्रमाचा आहे, ज्यात अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जात आहे.
या फोटोला पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी अत्यंत भावूक शब्दात कॅप्शन लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, “एक काळ असा होतो की, जेव्हा मी तुझा हात पकडून तुला घेऊन जायचो. आता तू माझा हात पकडून मला घेऊन जातो.” यासोबतच त्यांनी हॅप्पी बर्थडे अभिषेक असे देखील लिहिले केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर देखील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा अभिषेकचा जन्म झाला होता. या फोटोत अमिताभ बच्चन हे एका नर्स सोबत उभे राहिले आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोला शेअर करत अमिताभ बच्चन लिहतात की, “त्याला या जगात जन्माला येऊन अगदी काहीच मिनिटे झाली आहेत.” यासोबतच ते लिहतात की, “ते त्याच्या जन्माच्या आठवणीत रमले आहेत.”
याव्यतिरिक्त अभिषेक बच्चनची भाची ‘नव्या नावेली नंदा’ हिने देखील आपल्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्याने पोस्ट केले, “हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझे घरातील सगळ्यात आवडीचे सदस्य आहात आणि तुम्ही माझ्या प्रत्येक अपराधामध्ये सामील होत असता.”
https://www.instagram.com/p/CK4YwbVsotR/?utm_source=ig_web_copy_link
अभिषेकची भाची नव्या आणि अभिषेक यांच्यात खूप चांगलं कनेक्शन आहे. ही गोष्ट त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक वेळा शेअर केली आहे.
हेही वाचा-
‘वडिलांनी माझ्यासाठी नाही बनवला चित्रपट’, नेपोटिझमवर अभिषेक बच्चनने सोडले मौन