Sunday, July 14, 2024

कोणी चित्रकार तर कोणी बुद्धिबळपटू, बॉलिवूड कलाकार खेळांमध्येही आहेत आघाडीवर

बॉलिवूड कलाकार त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. सलमान खान ते अक्षय कुमार असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या अभिनयाने सिनसृष्टीवर अनेक दशकांपासून  अधिराज्य गाजवत आहेत. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच इतरही अनेक कलांमध्ये पारंगत आहेत. पाहूया बॉलिवूड कलाकारांच्या या माहित नसलेल्या कला. 

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की अभिनयासोबतच आमिर बुद्धिबळ खेळण्यातही पारंगत आहे. आमिरने बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदसोबतही बुद्धिबळ खेळला आहे. त्याच वेळी, खिलाडी कुमार देखील कमी प्रतिभावान नाही. अक्षय कुमारचे क्रीडाप्रेम कोणापासून लपलेले नाही. तसेच अक्षय मार्शल आर्ट्स आणि कुकिंगमध्ये पारंगत आहे. अनेकदा त्याचे किचनमध्ये स्वयंपाक करतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान अभिनयासोबतच पेंटिंगमध्येही निष्णात आहे. तुम्हाला माहीत आहे का सल्लू मियाँची पेंटिंग्स करोडोंमध्ये विकली जातात. भाईजान व्यतिरिक्त दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा देखील पेंटिंग्ज बनवण्यात निपुण आहे. दुसरीकडे, शाहिद कपूरला मोकळ्या वेळेत डीजे व्हायला आवडते. या यादीत बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगही मागे नाही.

रणवीर कॉपीरायटिंग खूप चांगले करतो आणि त्याच्या कौशल्याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अभिनयात करिअर करण्यापूर्वी तो जाहिरात एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम करत असे. त्याचप्रमाणे बोमन इराणी फोटोग्राफी, रणबीर कपूर फुटबॉल, आयुष्मान खुराना संगीत आणि रणदीप हुड्डा पोलो खेळण्यात माहिर आहे.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाले ‘हे’ कलाकार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
वजन वाढल्याने अमिताभ बच्चन चिंतेत; म्हणाले, ‘मी आता जेवण सोडून देणार’
शाहरुख खानच्या ‘वानर अस्त्र’ची झलक पाहून चाहते झाले बेभान, हनुमान बनून करणार आगीशी सामना

हे देखील वाचा