Saturday, July 6, 2024

सलमान खान ते अमिताभ बच्चन, ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या आलीशान बंगल्याच्या किमती पाहून व्हाल थक्क

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक रणवीर सिंग सध्या त्याच्या नवीन घरामुळे चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच त्याने आणि दीपिका पदुकोणने मुंबईतील वांद्रे येथे ११९ कोटी रुपयांना नवीन घर घेतले आहे. मुंबईत खरेदी केलेल्या या मालमत्तेची किंमत जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेवटी, घर खूप महाग आहे. 19 पार्किंग स्लॉट असलेले हे घर खरेदी करण्यासोबतच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे शेजारीही बनले आहेत. पण, रणवीर सिंग हा इंडस्ट्रीतील एकमेव अभिनेता नाही ज्याने मुंबईत करोडोंचा बंगला खरेदी केला आहे. चला तर मग आज पाहूया मुंबईत कोणत्या बॉलिवूड स्टार्सचे घर आहे, ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. या यादीत बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

शाहरुख खान – बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहरुख खानच्या श्रीमंतीबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच. त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी दररोज मैलांचा प्रवास करून त्याच्या घरी जातात. चार वर्षांनंतर लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची किंमत ऐकूण कोणालाही धक्का बसेल. शाहरुखने हा बंगला वर्षांपूर्वी केवळ 13 कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि आज त्याची किंमत 350 कोटी रुपये आहे.

अक्षय कुमार – अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने हिंदी सिने जगतात प्रचंड चाहता वर्ग कमावला आहे. खिलाडी कुमार आपल्या पत्नी आणि मुलांसह जुहूमध्ये राहतो, जो राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्याच्या या आलिशान बंगल्याची किंमत 80 कोटी आहे.

 प्रियांका चोप्रा – अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही या यादीत समावेश आहे. प्रियांकाची क्रेझ देश-विदेशात पसरली आहे. बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर प्रियांका हॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात मग्न आहे. निकसोबत लग्न केल्यानंतर प्रियांका अमेरिकेत स्थायिक झाली आहे. अभिनेत्रीने लॉस एंजेलिसमध्ये स्वतःचे घर घेतले आहे, ज्याची किंमत $ 20 दशलक्ष म्हणजे सुमारे 144 कोटी रुपये आहे.

शाहिद कपूर –बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर मुंबईच्या वरळी भागात कुटुंबासोबत राहतो. त्यांच्या या आलिशान अपार्टमेंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या घराची किंमत 56.6 कोटी रुपये आहे.

सलमान खान – इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक, सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील सर्वात आलिशान अपार्टमेंट गॅलेक्सीमध्ये राहतो. अनेक घरांचा मालक असूनही, सलमान खान या घराशी खूप जोडलेला आहे आणि रिपोर्ट्सनुसार, त्याच्या घराची किंमत 100 कोटी रुपये आहे.

अमिताभ बच्चन- अभिनेते अमिताभ बच्चन यांना दशकातील सुपरहिरो म्हटले जाते ते इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या घराचे मालक आहेत. त्यांचे घर खूप छान आहे, ज्याचे फोटो आपण सोशल मीडियावर अनेकदा पाहतो. त्यांच्या जलसा घराची किंमत 100 ते 120 कोटी आहे.

हे देखील वाचा