Wednesday, July 3, 2024

लग्नासाठी वाट्टेल ते! लग्नासाठी ‘या’ स्टार्सने बदलला होता धर्म, कुणी झाले मुस्लिम तर कुणी हिंदू

असे म्हणतात की जेव्हा प्रेम होते तेव्हा जात, समुदाय, धर्म असे काहीही दिसत नाही. दिसते ते फक्त प्रेम. हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी धर्माच्या भिंती तोडल्या आणि लग्न केले. काहींनी इस्लाम धर्म स्वीकारला तर काहींनी हिंदू धर्म स्वीकारून लग्न केले.

चला तर मंडळी आजच्या या लेखामध्ये आपण त्याच स्टार्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रेमासाठी आपला धर्मदेखील बदलला.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच धर्मेंद्रचे यांचे लग्न झालेलेे होते. येथे आल्यानंतर धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. जेव्हा त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट घेण्यास नकार दिला, त्यावर धर्मेंद्र यांनी तोडगा काढला. त्यांनी हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला. तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा या दोघांनीही मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस धर्मानुसार मुस्लिम होती आणि ती सुनील दत्तच्या प्रेमात पडली. सुनीलशी लग्न करण्यासाठी नर्गिसने आपला धर्म बदलला. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर नर्गिसने स्वत:चे नाव बदलून निर्मला दत्त ठेवले होते आणि सुनील दत्तबरोबर सात फेरे घेतले.

शर्मिला टागोर या जन्माने हिंदू होत्या. त्या क्रिकेटपटू मन्सुर अली खान पटौदी यांच्या प्रेमात पडल्या आणि लग्न करण्यापूर्वी त्यांनी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. धर्म परिवर्तनानंतर शर्मिला यांनी आपले नाव बदलून बेगम आयशा सुल्ताना ठेवले होते. तरी जग आताही त्यांना  शर्मिला नावानेच ओळखते.

शूटिंगच्या दरम्यान दिव्या भारती प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालाच्या प्रेमात पडली. वयाच्या 19व्या वर्षी साजिदशी लग्न करण्यासाठी दिव्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि ती सना नाडियाडवाला बनली. तथापि, लग्नाच्या एका वर्षानंतरच तिचा मृत्यू झाला.

सलमान खानच्या आईचे खरे नाव सुशीला चरक आहे, परंतु त्यांनी सलीम खानशी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आणि सुशीलाच्या सलमा झाल्या.

हे देखील वाचा