Saturday, June 29, 2024

पैसे, संपत्ती नाव सगळं काही तरी देखील ‘या’ अभिनेत्री आयुष्यभर का राहिल्या अविवाहित

अमुक ऍक्टरचं तमुक एकाशी लग्न झालं. त्याचं तिच्याशी तिचं त्याच्याशी अफेअर आहे अशा बातम्या आपण जवळपास रोजच ऐकतो, पाहातो, बरोबर ना… इतकंच नाही, घटस्पोट घेण्याच्या घटनाही सिनेसृष्टीत जवळपास दरवर्षी समोर येत असतात. पण या सर्वात असेही काही वूमन स्टार आहेत, ज्या अविवाहीत राहिल्या, असही म्हटले जाते की या महिला कलाकारांना प्रेमात अपयश आल्याने त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता… तर कोण आहेत या महिला कलाकार चला पाहूयात

गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांच्या अविवाहित राहण्यामागे अनेक कारणं असल्याचे म्हटले जाते, त्यांच्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी हे एक कारण होते. पण अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांचे डुंगलपूर राजघराण्यातील राज सिंग यांच्याशी प्रेम संबंध होते. पण राज सिंग यांनी त्यांच्या आई-वडीलांना एक वचन दिले होते, की ते कोणत्याही सामन्य मुलीशी लग्न करणार नाही. याच वचनामुळे त्यांना लता मंगेशकरांशी लग्न करता आले नाही. पण त्यांनीही अखेरपर्यंत लग्न केले नाही, तसेच लता मंगेशकर यांनीही लग्न केले नाही.

आपल्या बोल्ड लूकने ७०-८० च्या दशकात सर्वांचे आकर्षण बनलेली अभिनेत्री परवीन बाबी (parveen babi) देखील अविवाहीत राहिली. तिच्याबाबतीत काही वादही झाले. तिचे नाव तीन लोकांशी जोडले गेले होते. पहिले म्हणजे डॅनी, पण फार काळ ही जोडी चर्चेत राहिली नाही. त्यानंतर कबीर बेदी यांच्याशीही तिचे नाव जोडले गेले होते. कबीर हे विवाहीत होते. पण असे म्हटले जाते की कबीर बेदीने त्यांना धोका दिला. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार परवीन बॉबी दिग्दर्शक-प्रोड्यूसर महेश भट्ट यांच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. पण, तिचे लग्न मात्र शेवटपर्यंत कोणाशी झाले नाही. तसेच असेही समजले होते की तिला पॅरानॉईड सीजोफ्रेनिया नावाचा आजार झाला होता, यात लोक कल्पित घटनाही सत्य मानायला लागतात. याच आजारामुळे तिने अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. अखेर २००५ मध्ये ती हे जग सोडून गेली.

४०-५० च्या दशकात केवळ आपल्या सौंदर्यानेच नाही, तर अभिनयासोबत आपल्या आवाजानेही अनेकांना भूरळ पाडणारी कलाकार म्हणजे सुरैय्या. ती दिसायला मनमोहक होती. तसेच तिने चित्रपटांत ऍक्टिंग करण्याबरोबर गायचीही. असं म्हटले जाते की तिचे त्या काळचे चॉकलेट बॉय असणाऱ्या देवानंद यांच्याशी अफेअर होयचे. पण सुरय्याच्या आजीला हे नातं मान्य नव्हते. कारण या दोघांचे धर्म वेगळे होते. तिच्या आजीला तिने देव आनंद यांच्याबरोबर रोमँटिग सीन करणेही पसंत नव्हते. अखेर या दोघांचे प्रेम अधूरे राहिले. पुढे देव आनंद यांनी कल्पना कार्तिकबरोबर लग्न केले, तर सुरय्या मात्र अखेरपर्यंत अविवाहीत राहिल्या. त्यांचा वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.

यायादीतील चौथे नाव म्हणजे, आशा पारेख. (asha parekh) ७० च्या दशकात अनेक हिट सिनेमे आशा पारेख यांनी दिले. त्यांचे नाव दिग्दर्शक नासिर हुसेनबरोबरही जोडले गेले. असे म्हटले जाते, हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. अनेक रिपोर्टनुसार आशा पारेख यांच्यामते त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे कोणीही त्यांना लग्नासाठी विचारले नाही. त्या देखील अविवाहीत राहिल्या.

आपल्या अभिनयाबरोबरच अनेक वादांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे नगमा. तिचे नावही काही विवाहित पुरुषांबरोबर जोडले गेले, यात रवी किशन, आर सरथकुमार आणि सौरव गांगुली यांचा समावेश होता. या चर्चांमुळे अनेकदा वादही समोर आले. पण अखेर नगमानेही कोणाशी लग्न केले नाही.

सिंगल मदर म्हणून कौतुक होणारी सुश्मिता सेन हिनेही अद्याप कोणाशीही लग्न केलेले नाही. पण, यापुढेही ती करणार नाही, असं काही तिने स्पष्ट केलेले नाही. सध्या ती तिने दत्तक घेतलेल्या २ मुलींबरोबर तिचे आयुष्य व्यतीत करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ मराठी अभिनेत्यांनाही करावा लागलाय घटस्पोटाचा सामना

‘भूतकाळापासून धडा घेऊन बरंच काही बदललं आहे’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम मिहिर उपाध्यायचा खुलासा

कुणी म्हणतंय ‘सुपर’, तर कुणी ‘व्हेरी हॉट’, डीपनेक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसची हद्दच केली पार

हे देखील वाचा