Friday, July 5, 2024

आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या सुचित्रा सेन, लग्नाच्या 5 वर्षांनंतर ठेवले सिनेमात पाऊल

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी बंगालीशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप पाडली. सुचित्रा सेन यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत काम केले. त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेनबद्दल असं म्हटलं जातं की, त्या खूप स्वाभिमानी होत्या. त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही तर, त्या समोरच्या लोकांचे विचार पटकन नाकारायच्या. त्यांनी आपल्या उत्त्तम अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली होती. अश्लीलतेशिवाय पडद्यावर प्रणय कसे करावे, हे त्यांनी शिकवले. सुचित्रा सेन त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या. प्रत्येक दिग्दर्शकाला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. ६ एप्रिल रोजी जयंती होती. या निमित्त आज आम्ही त्यांच्या जीवनातील काही मनोरंजक गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

सुचित्रा सेनचा जन्म ६ एप्रिल, १९३१ रोजी बांगलादेशातील तत्कालीन पबना जिल्ह्यात झाला होता. त्यांचे खरे नाव ‘रोमा दासगुप्ता.’ त्यांचे वडील करुणोमय दासगुप्ता मुख्याध्यापक होते. रोमा दासगुप्ता यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पबनातून घेतले. १९४७ मध्ये रोमा दासगुप्ता यांचे बंगालचे सुप्रसिद्ध उद्योगपती आदिनाथ सेन यांचे पुत्र दिबानाथ सेन यांच्याशी लग्न झाले आणि त्यांचे नाव ‘सुचित्रा सेन’ झाले.

लग्नाच्या ५ वर्षानंतर या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले, आणि आपल्या अभिनयातून संपूर्ण चित्रपटसृष्टी हलवून टाकली. त्यांनी सुरुवातीला बंगाल सिनेमासाठी काम केले. त्यांचा ‘सारे चतुर’ हा बंगाली चित्रपट १९५२ मध्ये रिलीझ झाला, ज्याला त्यांचा पहिला चित्रपट म्हटले जाते. उत्तम कुमार आणि सुचित्रा सेनची यांची जोडी बंगाली सिनेमाची सर्वात प्रसिद्ध जोडी मानली जात होती. या दोघांनीही एक- एक करून अनोखे चित्रपट केले. १९५३ ते १९७८ दरम्यान सुचित्रा यांनी हिंदी आणि बांगलामध्ये एकूण ६१ चित्रपट केले. सुचित्रा यांच्या एकूण ६१ चित्रपटांपैकी ३० चित्रपट उत्तम कुमार यांच्यासोबत होते.

जेव्हा सुचित्रा यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा तिथेसुद्धा त्यांनी उत्त्तम कामगिरी केली. त्यांनी ‘मुसाफिर’, ‘हॉस्पिटल’, ‘मुंबई का बाबू’, ‘ममता’ आणि ‘आंधी’सारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले. देवदास आणि आंधी या चित्रपटात त्यांना चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली.

सुचित्रा या अशा अभिनेत्री होत्या, ज्या महान चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट देखील नाकारायच्या. या अभिनेत्रीने अगदी राज कपूर यांचेही चित्रपट नाकारले आहेत. असे म्हटले जाते की, सुचित्रा यांना राज कपूरची यांची वाकुन फुले देण्याची पद्धत आवडली नाही. इतकेच नाही तर दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना सुचित्रा यांना ‘देवी चौधरानी’ मध्ये कास्ट करण्याची इच्छा होती, परंतु या अभिनेत्रीने नकार दिला होता. सुचित्रा सेन अखेर १९७८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘प्रणोय पाश’ या बंगाली चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटानंतर त्यांनी इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतली. यानंतर त्या रामकृष्ण मिशनच्या सदस्या झाल्या, आणि सामाजिक कार्य करू लागल्या.

सुचित्रा यांना १९७२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यापूर्वी १९६३ साली त्यांना मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सप्तपदी’ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. सुचित्रा या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. सुचित्रा सेन या बॉलिवूड अभिनेत्री मुनमुन सेनची आई, आणि रिया आणि रायमा सेन यांची आजी आहेl. १७ जानेवारी, २०१४ रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा