बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या फिगर आणि फिटनेसच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट खूप गंभीरतेने घेते. परंतु लॉकडाऊनमुळे या दिवसात तिचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या ड्रेसची चैन लावायला एक- दोन नव्हे, तर तीन जण लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सुंदर गाऊन तिने परिधान तर केला आहे, परंतु समस्या अशी होती की ड्रेसची चैन लागत नव्हती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सनी लिओनीच्या संपूर्ण टीमने पूर्णपणे प्रयत्न केले, परंतु तरीही तिच्या गाऊनच्या मागची चैन बंद होऊ शकली नाही.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’ या शोच्या मेकअप रूमचा आहे. जिथे अभिनेत्रीची संपूर्ण टीम या कामात मग्न आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, अभिनेत्री वॉर्डरोब मॉलफंक्शनला बळी पडली आहे. व्हिडिओ शेअर करत सनीने लिहिले की, “गाऊन परिपूर्ण बनवण्यासाठी सैन्याची आवश्यकता असते.”
अभिनेत्रीसोबत वॉर्डरोब मॉलफंक्शनला बळी पडण्याची ही घटना काही प्रथमच घडलेली नाही. या आधीही तिला बर्याच वेळा अशा पेचप्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
तसेच, अलीकडे सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना एक मजेदार चॅलेंज देताना दिसली. या व्हायरल व्हिडिओमध्ये सनी एक ओळ बोलताना दिसत होती आणि इतरांना ही ओळ सतत बोलायची होती. खरं तर, चॅलेंज असे होते की, तुम्ही कितीदा ती ओळ बरोबर बोलू शकता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जॅकलिन फर्नांडिस योगा करताना ‘या’ गोंडस पार्टनरने दिली तिला साथ; पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री!
-काय दिवस आलेत! अभिनेत्री अनिता हसनंदानीने मारली पतीला कानाखाली; महिलांनाही सांगितली मॅजिक ट्रिक