‘बिग बॉस 14’ हा शोची लोकप्रियता आता शिगेला पोहचली आहे. शोमध्ये गेल्या एका आठवड्यापासून राखीची वागणुक पाहून असे वाटत होते की होस्ट सलमान खान तिच्यावर चांगलाच बरसेल आणि तिथे घडलेही तसेच. बिग बॉसच्या या 14 व्या आठवड्यात सलमान ‘वीकेंड का वॉर’ मध्ये राखीसह इतर स्पर्धकांवरही निशाना साधताना दिसला.
शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खूपच रागात होता. यामध्ये तो घरातील प्रत्येक सदस्यावर चिडताना आणि त्यांच्यावर ओरडताना दिसला. आठवड्याभरात फुटेज आणि कंटेंटसाठी प्रतिस्पर्ध्यांनी ज्या प्रकारे एकमेकांशी गैरवर्तन केले हे पाहून सलमानने नाराजी व्यक्त केली.
सलमान खान निक्की तांबोळीवरही संतापला. तो म्हणाला, ‘लोखंडवाला? तू कुठून चंद्रावरून आली आहेस का?’ झाले असे की, निक्कीने राखीच्या मेकअप ब्रँडची लोखंडवाला ब्रँड म्हणून थट्टा केली होती. त्याचवेळी अली गोनीवरही तो चिडताना दिसला. नंतर अलीने सलमानची माफी देखील मागितली.
सलमान रागाने म्हणाला, ‘आपली तोंडं बंद करा!’ यानंतर तो म्हणाला, ‘या सीजन मध्ये नेहमी हे का ऐकायला मिळतं की हे सगळं कंटेंटसाठी केलं जातं? हे काय मी कंटेंटसाठी करत आहे का? घरात जे काही घडतं ते तुम्ही लोकं करता, तुम्ही लोकं बोलता आणि आम्ही हेच प्रेक्षकांना दाखवत आहोत’.
यानंतर सलमानने राखी सावंतला थिएटरमध्ये जायला सांगितले. तो म्हणाला, ‘राखी, तुम्ही लोकांची निंदा करता, त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न करता’. राखी आपले मत मांडताना बोलली, ‘हे असे बोलणे बरोबर नाही सर’. यानंतर राखीला सलमानच्या रोषाचा सामना करावा लागला. तो म्हणाला, ‘तुमचे मनोरंजन जर असे असेल, तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता’. हे ऐकून राखीने माफी मागितली व पुन्हा असे बोलणार नाही हे आश्वासन दिले.