Sunday, June 16, 2024

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर ‘या’ कारणामुळे गप्प होती क्रिती सेनन; पोस्ट शेअर करत केला खुलासा

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाने सर्वांना हादरवून सोडले होते. दिवंगत अभिनेत्याचे जवळचे मित्र आणि चाहते अद्याप ही घटना विसरलेले नाहीत. आता सुशांत सिंग राजपूतची जिवलग मैत्रीण आणि अभिनेत्री क्रिती सेननने त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ती आतापर्यंत गप्प का होती, हे तिने नऊ महिन्यांनंतर सांगितले आहे.

वृत्तानुसार, क्रिती सेननने सांगितले की, 2020 हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होते. त्यानंतर तिने तिचा जवळचा मित्र सुशांतच्या निधनानंतर मौन बाळगल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रिती म्हणाली, “या प्रकरणाबद्दल सगळीकडे इतका गोंधळ झाला होता की, मला यात भाग घ्यायचा नव्हता. हा मुद्दा अशा ठिकाणी पोहोचला होता की, लोकांनी संवेदनशील राहणे बंद केले आणि सर्वत्र आणि नकारात्मकता पसरू लागली.”

ती पुढे म्हणाली, “मला त्या नकारात्मकतेचा भाग व्हायचं नव्हतं. त्या परिस्थितीत मला कसं वाटत होतं, हे मला माहिती आहे आणि मला ते माझ्याकडेच ठेवण्याची इच्छा आहे. या व्यतिरिक्त आपण सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडू शकतो. ओरडण्याऐवजी आपण आपल्या भावना लिहूनही व्यक्त करू शकतो.”

विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यूने क्रितीला देखील हादरवून सोडले होते. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून तिने दिवंगत अभिनेत्याची आठवण काढली. कृतीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ”सुश… मला माहित आहे की, तुझं हुशार डोकं तुझा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू होता. पण तुझ्या आयुष्यातील त्या क्षणामुळे मला पूर्णपणे धक्का बसला, जेव्हा जिवंत राहण्यापेक्षा तुला मृत्यू सोपा वाटला. माझी इच्छा आहे की, कदाचित तुझ्या आयुष्यातील लोक त्या क्षणी तुझ्या जवळ असायला हवे होते. कदाचित मी ती गोष्ट जोडायला हवी होती, जी तुला आतमध्येच तोडत होती, पण मी हे नाही करू शकले. माझ्या अंतःकरणाचा एक भाग तुझ्या सोबत गेला आहे आणि एक भाग तुला कायमचा जिवंत ठेवेल. तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करणे कधीही थांबवले नाही आणि कधी थांबवणारही नाही.”

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरात सापडला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई व बिहार पोलिसांनी केला. मात्र, काही काळानंतर सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे गेले. आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याच वेळी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल्स समोर आल्यानंतर, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 1 महिन्यासाठी तुरूंगात जावे लागले होतते. रियाला सध्या जामीन मंजूर झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिया चक्रवर्तीमुळे ‘चेहरे’ अडचणीत; मात्र निर्मात्यांचा अभिनेत्रीला पूर्ण पाठिंबा!

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

हे देखील वाचा