‘शिक्षक’ हा मानवी जीवनाचा एक अमुल्य भाग आहे ज्यातून त्याला ज्ञान आणि शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. वाट चुकली तर कान पिरघळुन याेग्य मार्ग दाखवणारा, रोज काहीतरी नवीन शिकवणारा आणि नवीन गाेष्टी सांगणाऱ्या शिक्षक असताे. 5 सप्टेंबर राेजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिनिमित्य भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी, आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सिनेमॅटिक पडद्यावर शिक्षकाची भूमिका उत्तमरित्या साकारली. तर काेण आहे ते अभिनेत्री चला जाणुन घेऊया…
राणी मुखर्जी
राणी मुखर्जीचा (Rani mukherjee) २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘हिचकी’ चित्रपट तुम्हाला आठवत असेल. राणी मुखर्जीच्या चित्रपटाची स्टाेरी ब्रॅड कोचिन ह्या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये ती आजाराशी झुंज देत असतानाही शिक्षिका बनण्याची आकांक्षा बाळगते आणि संघर्ष करत यशस्वी होते.
आमिर खान
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात अभिनेता अमीर खानने राम शंकर निकुंभ नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. हि भुमिका चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांनीही माेठ्या पडद्यावर अनेकदा शिक्षकाची भूमिका साकारली आहे. त्यात ‘ब्लॅक’, ‘मोहब्बतें’ आणि ‘आरक्षण’ या दमदार चित्रपटाचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटात शिक्षकाच्या भूमिकेत बिग बींची वेगळी शैली पाहायला मिळाली. मोहब्बतें या चित्रपटात अमिताभची भूमिका कठोर शिक्षकाची होती, तर ब्लॅक चित्रपटात त्यांनी एका अंध आणि जिद्दी मुलीच्या शिक्षिकाची भूमिका साकारली होती.
बॉलिवूडचा सुपर हँडसम अभिनेता हृतिक रोशनने ह्याने सुपर ‘३०’ नावाच्या या चित्रपटात बिहारमधील शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. ह्या चित्रपटात शिक्षण हा केवळ मोठ्या घरातील मुलांचा हक्क नाही हे दाखवण्यात आले होते.
बोमन इराणी
बोमन इराणी यांनी 2009 मध्ये आलेला ‘3 इडियट्स’ चित्रपटात डॉ वीरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसची भूमिका साकारली होती. त्यांचे भुमिका माेजक्या शब्दात सांगायचे झाले तर, त्यांनी शिक्षक म्हणून नेहमी रागीट, दुःखी, रागावणाऱ्या व्यक्तीचे पात्र साकारले. त्याला पडद्यावर चांगलीच पसंती मिळाली होती. आजही लोक त्यांना व्हायरसच्या नावाने ओळखतात.
सुष्मिता सेन
‘मैं हूं ना’ चित्रपटातील सुष्मिता सेनची व्यक्तिरेखा आजपर्यंत कोणीही विसरू शकले नाही. बॉलिवूडच्या हॉट टीचरच्या यादीत सुष्मिता सेनचे नाव पहिले येते. निखळ साडी आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये सुष्मिताने ज्या पद्धतीने केमिस्ट्री टीचरची भूमिका साकारली आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
आयशा टाकियाने
आता सिनेमासृष्टी पासुन दूर असलेल्या आयशा टाकियानेही ‘पाठशाला’ चित्रपटात शिक्षिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आयशाच्या केवळ लूकने विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळवले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बापरे! अनन्या पांडेने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी तीन तीन…
’माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ टॅलेंटवर दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमानही झाल्या होत्या फिदा, वाचा रंजक किस्सा‘दुसरे लग्न करण्यासाठी बदलला धर्म…’, महेश भट्ट यांच्यावर संतापली कंगना रणौत