Saturday, June 29, 2024

फोटोत दिसणारी चिमुरडी आज आहे पंजाबची कॅटरिना कैफ, दिसतीये एकदम स्वीट अँड क्यूट

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडिया चांगलेच सक्रीय असतात आणि वेगवेगळे आव्हाने ते आपल्या चाहत्यांसमोर ठेवतात. आता असाच एक आव्हान हे कलाकार त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आले आहेत. ज्यामध्ये बाॅलीवुडचे कलाकार त्यांच्या लहाणपणीचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करुन चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. अशाच एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यामधे एक छोटीशी चिमुकली मोठ्यांने रडताना दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गोंडस बाळ हात दाखवुन मोठ्यांने रडताना दिसत आहे. या चिमुकलीला ओळखणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. त्याचबरोबर हे मोठ्याने रडत असलेले बाळ आजच्या घडीतील मोठी स्टार आहे.    

हो खरच ही चिमुकली आजच्या घडीतील आघाडीची स्टार आहे. तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये आपल्या दिलखुलास स्वभावामुळे पूर्ण देशाची आवडती बनली आहे. ही चिमुकली दुसरी कोणी नसून सगळ्यांची आवडती शहनाज गिल आहे. शहनाज गिलच्या या फोटोने चाहत्यांना भुरळ घातली आहे. काही लोक शहनाजला लगेच ओळखण्यात यशस्वी ठरतात. पण त्याचबरोबर काही लोक कितीही प्रयत्न केले तरी तिला ओळखन त्यांना खूप कठीण जात आहे.

‘बिग बॉस १३’ मध्ये भाग घेऊन शेहनाज गिलची खूप लोकप्रियता वाढली आहे. या शोमध्ये ती आणि सिद्धार्थ शुक्लाच्याच्या जोडीने सगळ्यांचे मन वेधून घेतले होते. चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाज’ हे नाव दिले होते. बिग बॉसच्या नंतर तिने काही म्यूजिक एलबम्समध्ये काम केले होते. येवढच नाही तर ती पंजाबी फिल्म ‘हौंसला रख’ मध्येही दिसली होती. शेहनाज गिलची लोकप्रियता येवढी जास्त आहे की, आजच्या घडीला तिच्याजवळ कामाचा भरमसाठ साठा आहे.

सिद्धार्थ आणि शेहनाझची जोडी सगळ्यांना खूप आवडत होती. परंतु सिद्धार्थच्या मृत्यूने त्यांची जोडी एक आठवण बनून राहिली. त्याच्या मृत्यूनंतर शेहनाझ अगदी सदम्यात गेली होती. आता कुठे ती या धक्यातून बाहेर आली आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा