कोणताही चित्रपट पाहताना प्रत्येकाचे लक्ष नायक वेधून घेत असतो. तो आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने आपली छाप चाहत्यांच्या मनावर पाडण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या नायकाला जितके अभिनय करणे कठीण जाते, त्याचप्रमाणे खलनायक देखील आपला जीव ओतून भूमिका साकारत असतात. चित्रपटात नायकाची भूमिका महत्वाची असली, तरीही त्याच्यासह खलनायकाचीही भूमिका प्रचंड महत्त्वाची असते. जेव्हा विजयाचा प्रश्न येतो, तेव्हा शेवटी नायकाचाच विजय दाखवला जातो. असे अनेक चित्रपट इंडस्ट्रीत आले, ज्यांचे नायक तुम्हाला क्वचितच आठवतील, पण खलनायक कायमचे आठवणीत राहिले. या अभिनेत्यांनी खलनायक म्हणून इंडस्ट्रीवर राज्य केले. एवढेच नाही, तर आजही या खलनायकांचे चेहरे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया, जे आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूडचे सदाबहार खलनायक बनले आहेत.
अमजद खान
“एक ही आदमी और वो है खुद गब्बर”, “ये हाथ हमको दे दे ठाकूर”, “कितने आदमी थे”, “ये रामगढ़ वाले अपनी बेटियों को कौन सी चक्की का आटा खिलाते हैं”, “तेरा क्या होगा कालिया”, “बहुत याराना लगता है”, “जो डर गया, वो मर गया”, “अरे, ओ सांबा”, “गब्बर के ताप से तुम्हे एक ही आदमी बचा सकता है,” असे गब्बरचे प्रसिद्ध डायलॉग्ज आजही अजरामर आहेत. गब्बरची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी ही भूमिका अजरामर तर केलीच, पण आजही ते चाहत्यांच्या मनात ते जिवंत आहेत. बॉलिवूडमधील खलनायकांचा विचार केला, तरी गब्बरचे नाव प्रथम येते.
प्राण
“इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता”, “शेरखान ने शादी नहीं की तो क्या हुआ, लेकिन बारातें बहुत देखी हैं”, “शेर खान आज का काम कल पर नहीं छोड़ता”, “शेरखान ने शादी नहीं की तो क्या हुआ, लेकिन बारातें बहुत देखी हैं”, “चिल्लाओ नहीं साहब, वरना गला खराब हो जाएगा”, “बर्खुदार…”, असे उत्तम डायलॉग्जने प्राण त्यांच्या काळातील सर्वात संस्मरणीय खलनायक बनले. आजही प्राण यांचे डायलॉग्ज चाहत्यांच्या ओठांवर आहेत.
अमरीश पुरी
अमरीश पुरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, पण त्यांचा एक डायलॉग “मोगॅम्बो खुश हुआ…” आजही प्रसिद्ध आहे. अमरीश पुरी यांची खास गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या नकारात्मक भूमिकेत अशाप्रकारे प्राण फुंकले की, ते चित्रपटात नायकापेक्षा खलनायक म्हणून जास्त प्रसिद्ध झाले.
प्रेम चोप्रा
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रेम चोप्रा यांचे नाव खलनायकाच्या यादीत नाही, असे कसे होऊ शकते. ‘उपकार’ या चित्रपटातून त्यांनी खलनायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यांचा “प्रेम नाम है मेरा” हा डायलॉग आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे.
शक्ती कपूर
शक्ती कपूर यांनी खलनायक म्हणून एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांतील दमदार भूमिकेसाठी ते आजही स्मरणात आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांना अनेकदा बलात्कारी व्यक्तीची भूमिका देण्यात आली होती.
गुलशन ग्रोव्हर
बॉलिवूडचा बॅड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी खलनायक म्हणून एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. ‘राम लखन’, ‘मोहरा’, ‘१६ डिसेंबर’, ‘क्रिमिनल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Children’s Day 2021: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, ‘ही’ फिल्मी गाणी ऐकत बनवा तुमचा बालदिन खास
-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…